एक पोत, दोन बैल अन् मोठा सस्पेन्स! 4.71 लाखांचं सोनं नेमकं कोणी गिळलं? डॉक्टरांनी…
Bull Swallows Gold Necklace : पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने चक्क 4 लाख 71 हजार रुपये किमतीची 3 तोळ्यांची सोन्याची पोत गिळल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या बैलाच्या पोटातून...

चाळीसगावमध्ये पोळ्याच्या दिवशी नैवेद्यासोबत बैलाने तीन तोळ्याची सोन्याची पोत गिळली होती. या प्रकरणामध्ये आता दहा दिवसानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैलावर यशस्वी शास्त्रक्रिया करत बैलाच्या पोटातून सोन्याची पोत काढत बैलाला जीवदान दिले आहे. बैल जोडीतील कोणत्या बैलाने सोन्याची पोत गिळली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला संभ्रम झाला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आधुनिक एक्स-रे च्या साह्याने बैलाच्या पोटातील सोन्याची पोत शोधली त्यामुळे बैलाच्या पोटात गेलेली सोन्याची पोत निघाल्याने मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांनी घेतला सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने चक्क 4 लाख 71 हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैलावर यशस्वी शस्त्रक्रिया करत ही सोन्याची पोत बैलाच्या पोटातून बाहेर काढून बैलाला जीवदान दिले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या बैलाने पोळ्याच्या दिवशी नैवेद्यासोबत बैलाने तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळली होती.
मात्र बैलजोडीतील नेमक्या कोणत्या बैलाच्या पोटात सोन्याची पोत गेली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आधुनिक एक्स-रेच्या मदतीने बैलाच्या पोटात सोन्याची पोत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी बैलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत बैलाच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत बाहेर काढली आणि बैलाला जीवदान दिलं. बैलाच्या पोटातून अखेर सोन्याची पोत सुखरूप बाहेर निघाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, या घटनेनंतर बैलाच्या प्रकृतीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर बैलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या अनोख्या घटनेची परिसरातही चर्चा झाली होती. सोन्याची पोत बाहेर काढण्यात यश आल्याने शेतकरी शिवाजी बोरसे यांना मोठा दिलासा मिळाला असून बैलही सुखरूप असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.