जिथे कचऱ्याचं साम्राज्य होतं, तिथे हजारो फुले फुलणार; कल्याणच्या डंपिंगवर साकारणार गार्डन

| Updated on: May 26, 2021 | 7:29 PM

ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ कचऱ्याचं साम्राज्य होतं... ज्या ठिकाणी चुकूनही कोणी फिरकायचं नाही... ज्या ठिकाणी लोक नाक मुठीत घेऊन जीवन कंठायचे... (commissioner vijay suryavanshi visited adharwadi dumping ground)

जिथे कचऱ्याचं साम्राज्य होतं, तिथे हजारो फुले फुलणार; कल्याणच्या डंपिंगवर साकारणार गार्डन
vijay suryavanshi
Follow us on

कल्याण: ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ कचऱ्याचं साम्राज्य होतं… ज्या ठिकाणी चुकूनही कोणी फिरकायचं नाही… ज्या ठिकाणी लोक नाक मुठीत घेऊन जीवन कंठायचे… ज्या ठिकाणी श्वसनविकाराचा त्रासही सहन करावा लागायचा… अशा कचऱ्याच्या साम्राज्यावर फुलांचं नंदनवन फुलणार आहे, असं सांगितलं तर तुम्हालाही खरं वाटणार नाही… पण ते खरं आहे. कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर लवकरच मोठं गार्डन साकारण्यात येणार आहे. तशी घोषणाच कल्याण-डोंबिवलीचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. (commissioner vijay suryavanshi visited adharwadi dumping ground)

काल 25 मेपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड कायमस्वरुपी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आज महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या डंपिंगची पाहणी केली. या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी ऑगस्टीन घुटे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे उपस्थित होते. यावेळी आधारवाडी डंपिंग ग्राउंड कालपासून बंद झाला आहे. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. आता या जागेवरील सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार असल्याची घोषणा सूर्यवंशी यांनी केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना येणाऱ्या काळात एक प्रेक्षणीय स्थळ उपलब्ध होणार आहे.

स्मार्ट सिटीचा प्रकल्प उभारणार

जवळपास 16 एकरच्या आसपास हा भूखंड आहे. त्यावर आजमितीस 21 घनमीटर मॅट्रीक टन इतका कचरा आहे. त्यापैकी 10 घन मीटर कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाऊ शकते. जो विघटन होणारा कचरा नाही, तो भिवंडी येथील एका दगड खाणीत बायोमायनिंग केला जाईल. ही जागा मोकळी झाल्यावर खाडी किनारी रिव्हर फ्रंट विकसीत करायचा आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत या जागेत उद्यान, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक विकसीत केले जाणार आहे, असं ते म्हणाले.

अशी होणार कचऱ्यावर प्रक्रिया

डंपिंगच्या त्रासातून  नागरिकांची सुटका झाली आहे. आता हा कचरा उंबर्डे आणि बारावे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पाठविला जाणार आहे. 50 टन ओल्या कचऱ्यावर पाच ठिकाणी असलेल्या बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. बारावे प्रकल्पांच्या संदर्भातील हरित लवादाकडे असलेली याचिका लवादाने निकाली काढली आहे. डोंबिवलीतही 50 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक संस्था पुढे आली आहे. त्याठिकाणी महापालिकेस काही खर्च करायचा नाही. संबंधित संस्थेला केवळ कचरा महापालिका प्रक्रियेसाठी देणार आहे. काही बडया सोसायट्या 50 टन कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे, असं त्यांनी सांगितलं. (commissioner vijay suryavanshi visited adharwadi dumping ground)

 

संबंधित बातम्या:

कल्याणकर घेणार मोकळा श्वास; अखेर 38 वर्षानंतर आधारवाडी डंपिंग बंद

रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटलं

ठाण्यात ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांमुळेच महामारी पसरणार; राष्ट्रवादीचा दावा

(commissioner vijay suryavanshi visited adharwadi dumping ground)