AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांमुळेच महामारी पसरणार; राष्ट्रवादीचा दावा

पावसाळा तोंडावर येताच मुंबईप्रमाणेच आता ठाण्यातही नालेसफाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. (Ncp leader shamim khan attacks Thane civic body over nullah cleaning work)

ठाण्यात ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांमुळेच महामारी पसरणार; राष्ट्रवादीचा दावा
thane municipal corporation
| Updated on: May 26, 2021 | 4:46 PM
Share

ठाणे: पावसाळा तोंडावर येताच मुंबईप्रमाणेच आता ठाण्यातही नालेसफाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. ठाण्यात नाल्यातील गाळ रस्त्यावरच फेकण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका प्रशासनावर टीका केली आहे. रस्त्यावर कचरा फेकल्याने ठाणे शहरात महामारी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारे महामारी पसरल्यास त्याला ठेकेदार आणि पालिका अधिकारीच जबाबदार असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. (Ncp leader shamim khan attacks Thane civic body over nullah cleaning work)

परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिलं आहे. या पत्रातून त्यांनी थेट ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. ठाणे शहरात सध्या नालेसफाई केली जात आहे. मात्र, नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा तत्काळ उचलण्यात येत नाही. हा गाळ नाल्याच्या किनार्‍यावर तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे. त्यावर डासांची पैदास होत आहे. परिणामी, एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता टायफॉईड, मलेरिया आदी आजार फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी तकलादू नालेसफाई करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठिशी घालणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शमीम खान यांनी केली आहे.

कार्यकर्त्यांकडून धडा घ्या

दरम्यान, मुंब्रा-कौसा भागात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार सयद अली अश्रफ आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीतील पालिका नेते नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, गटनेते, नजीब मुल्ला, संघर्ष महिला अध्यक्षा ऋता जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाक्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महामारी पसरू नये, यासाठी काम करीत आहेत. त्यांच्यापासून अधिकारी वर्गाने धडा घ्यावा, असा टोलाही खान यांनी लगावला आहे. (Ncp leader shamim khan attacks Thane civic body over nullah cleaning work)

संबंधित बातम्या:

कल्याणकर घेणार मोकळा श्वास; अखेर 38 वर्षानंतर आधारवाडी डंपिंग बंद

मस्तच! पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डोंबिवली सज्ज; 70 बेड्सचा बालरोग विभाग सुरू करणार

(Ncp leader shamim khan attacks Thane civic body over nullah cleaning work)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.