नागपूरमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांची फौज आली, पदवीधरचा निकाल जाहीर होण्याआधीच तणाव!

नागपूर पदवीधर निवडणुकीचा विजयाचा निर्णय निश्चित होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिजित वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. त्यामुळे नागपूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडले आहे. त्यामुळे वातावरण तापले असून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे..

नागपूरमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांची फौज आली, पदवीधरचा निकाल जाहीर होण्याआधीच तणाव!
| Updated on: Oct 28, 2026 | 10:27 PM

नागपूर पदवीधर निवडणुकीचा विजयाचा निर्णय निश्चित होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिजित वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. त्यामुळे नागपूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडले आहे. त्यामुळे वातावरण तापले असून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल लागत आहेत. एकूण पाच जागांसाठी १८२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. पुणे, छत्रपती संभाजीनगर , नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात उभे असून मुख्य लढत भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात होत आहे. सुमारे सहा दशकांच्या वर्चस्वानंतर २०२० मध्ये काँग्रेसने हिसकावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न भाजप करीत होता. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीचे विजेते काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मतात पुन्हा आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होण्याआधी विजयाचा जल्लोष सुरु केला आहे.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us