मोठी बातमी! महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?
मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघासाठी पुन्हा एकदा अभिजीत वंजारी यांनाच संधी देण्यात आली आहे. तर पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदार संघामधून आधीच आदिती पोहोरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी होती. याबाबत काँग्रेस नेत्या यशमती ठाकूर यांनी आधीच संकेत दिले होते. शेवटी अमरवाती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहोरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
कोण आहेत आदिती पोहोरे?
प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपमध्ये रस्सीखेच
दरम्यान दुसरीकडे मात्र अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या दोन्ही जागेवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्याच्या पदवीधर तर शिवसेना शिंदे गटाकडून शिक्षक मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.