काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील : नाना पटोले

| Updated on: Jul 08, 2021 | 1:31 AM

भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील : नाना पटोले
nana patole
Follow us on

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून, कामगारांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले. कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. (Congress party will stand firmly behind Mathadi workers says Nana Patole)

पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश

टिळक भवन येथे आज माथाडी कामगार नेते राजन म्हात्रे, छगन पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.

आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन

परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास पटोले यांनी यावेळी दिला आणि काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटना सर्वात मोठी संघटना करा असे आवाहन केले.

महाराष्ट्र आदिवासी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

टिळक भवन येथील कार्यक्रमात लोकनेते नानाभाऊ पटोले सोशल फोरम काँग्रेस पक्षात समाविष्ठ करण्यात आला. कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र आदिवासी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिदास दत्तु चव्हाण शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

इतर बातम्या

Bhagwat karad in cabinet: गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपद, वाचा भागवत कराड कोण आहेत?

‘सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाईल, ईडी, सीबीआयला याच कामासाठी ठेवलं’, हसन मुश्रीफांचा घणाघात

Congress party will stand firmly behind Mathadi workers says Nana Patole