Bhagwat karad in cabinet: गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपद, वाचा भागवत कराड कोण आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Modi cabinet expansion)

Bhagwat karad in cabinet: गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपद, वाचा भागवत कराड कोण आहेत?
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 5:06 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कराड यांची ओळख आहे. त्यांच्यामुळेच कराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तीनवेळा नगरसेव, औरंगाबादचे माजी महापौर ते केंद्रीय मंत्री असा कराड यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.  (Who is Bhagwat Karad)

भागवत कराड कोण आहेत?

-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक -1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर -2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर -2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी

डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.

अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी

डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Who is Bhagwat Karad)

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

26 मार्च रोजी 2020 रोजी राज्यसभेची निवडणूक झाली. त्यात कराड विजयी झाले. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. ही मतं कराड यांना मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे. (Who is Bhagwat Karad)

जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

कराड यांना मंत्रिपद देऊन मोदींनी जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. कराड हे वंजारी आहे. ते ओबीसी प्रवर्गातून येतात. महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठीच भाजपने कराड यांना मंत्रिपदाची संधी दिल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Reshuffle: संभाव्य चर्चेला पूर्णविराम, महाराष्ट्रातून 4 नेते मंत्रीपदी, राणे, कराड, पवार, पाटलांना संधी, 43 मंत्र्यांची अधिकृत यादी एका क्लिकवर

Modi Cabinet Reshuffle: कोण मंत्री होणार यापेक्षा कोण घरी गेलं याचीच चर्चा जास्त; 12 मंत्र्यांना हटवलं

narayan rane in cabinet: कट्टर शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; वाचा, कशी आहे नारायण राणेंची राजकीय कारकिर्द?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.