AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाईल, ईडी, सीबीआयला याच कामासाठी ठेवलं’, हसन मुश्रीफांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कुठल्याही टोकाला जायचं ठरवलं आहे. ईडी आणि सीबीआय यांना याच कामासाठी ठेवलं आहे, असा घणाघात मुश्रीफ यांनी केलाय

'सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाईल, ईडी, सीबीआयला याच कामासाठी ठेवलं', हसन मुश्रीफांचा घणाघात
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 07, 2021 | 4:19 PM
Share

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआयकडून चौकशीचा ससेमिरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कुठल्याही टोकाला जायचं ठरवलं आहे. ईडी आणि सीबीआय यांना याच कामासाठी ठेवलं आहे, असा घणाघात मुश्रीफ यांनी केलाय. (Criticism of Hasan Mushrif on Central Government)

कुणाला कुठेही ते अडकवतील, कुणाच्याही मागे लागतील, त्यांनी सर्व निती नियम गुंडाळून डोक्याला बांधले आहेत. सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, हे सरकार 100 टक्के पाच वर्षे टिकेल कुणी काहीही करु शकत नाही, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी इम्पेरिकल डाटा महत्वाचा आहे. मात्र कोरोना काळात जनगणना करणं शक्य नाही. 2011 चा डेटा केंद्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तो डेटा केंद्रानं दिला तर तत्काळ आरक्षण मिळेल, असंही मुश्रीफ म्हणाले.

‘कोर्ट हस्तक्षेप करणार नाही’

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरुन आता भाजप नेत्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केलीय. याबाबत विचारलं असता, भाजपचे निलंबित आमदार न्यायालयात गेले तरी हा विधिमंडळाचा अधिकार आहे. हा विधिमंडळाच्या आवारात घडलेला प्रकार आहे त्यामुळे कोर्ट हस्तक्षेप करत नाही, असा दावाही मुश्रीफ यांनी केलाय.

मुश्रीफ यांचा पडळकरांना दम

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका सुरुच ठेवली आहे. त्यावर गोपीचंद पडळकरांना अशा ठेवणीतील शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, असा इशाराही यावेळी मुश्रीफ यांनी दिला होता. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी यामागे बोलावते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असल्याचाही आरोप केला होता.

हसन मुश्रीफ म्हणाले, “मी यांना या निमित्ताने इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील. अशा प्रकारची पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. कायदा सुव्यवस्था देखील यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील.”

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंना आता जी काय CD लावायचेय ती लावू द्या; अतुल भातखळकरांचं खुलं आव्हान

Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

Criticism of Hasan Mushrif on Central Government

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत