Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

Modi Cabinet Expansion | गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान (Cabinet Expansion) न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत.

Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या...
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे

मुंबई: अगदी कालपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज सकाळपासून हे चित्र पूर्णपणे पालटले आणि पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील काही अनपेक्षित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र, तरीही काहीजण प्रीतम मुंडे या मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याचा छातीठोक दावा करत होते. (BJP leader Pankaja Munde tweet before Modi government cabinet expansion)

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे आता पहावे लागेल.

‘भाजपने प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं नाही, ओबीसी समाजाचा विसर पडला’

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान (Cabinet Expansion) न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही आहे, याकडे प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज सकाळपासून अचानक भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रीपद हुकल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपने मराठा आणि ओबीस चा राजकारणातला चेहरा महाराष्ट्रातला देण्याचा प्रयत्न केलाय. तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण च राजकारण सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा समाजाचे नेते आणि कपिल पाटील आगरी समाजाचे तसंच वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी आणि मराठा कार्डचा फायदा भाजपला पुढील राजकारणात व्हावा हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्र्यांना जागा मिळू शकते, जाणून घ्या फॉर्म्युला

Modi Cabinet Expansion LIVE Updates : पीएम मोदींच्या निवासस्थानावरील बैठक संपली, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांचा राजीनामा

असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल

(BJP leader Pankaja Munde tweet before Modi government cabinet expansion)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI