दापोलीत सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू

| Updated on: Dec 18, 2020 | 1:51 PM

या सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तर, तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दापोलीत सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू
Follow us on

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनारी 6 पर्यटक बुडाल्याची घटना घडली (Dapoli Six Tourists Drown ). या सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तर, तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे सर्व पर्यटक पुण्यात राहणारे आहेत. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळ दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे (Dapoli Six Tourists Drown ).

पुणे जिल्ह्यातील औंध येथून निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे हे सहा पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आले होते. हे पर्यटक आज दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडाले.

बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. सध्या या तीन तरुणांना दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे (Dapoli Six Tourists Drown ).

जेव्हा हे तरुण बुडाल्याचं निदर्शनास येता स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, ते फक्त तिघांचे प्राण वाचवू शकले. इतर तीन पर्यटक हे बेपत्ता होते. त्यांचाही शोध स्थानिक घेत होते. या घटनेची माहिती दापोली पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. काही वेळाने हे तिघेही मृतावस्थेत आढळून आले.

दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dapoli Six Tourists Drown

संबंधित बातम्या :

दापोलीत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह बेतला जिवावर

भूमध्य समुद्रात बोट दुर्घटना, 74 जण बुडाले, लिबियानं स्थलांतरितांविषयी धोरण बदलाव: संयुक्त राष्ट्र

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेरात कैद