राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेऱ्यात कैद

राजस्थानच्या बुंदीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला.

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेऱ्यात कैद

कोटा : राजस्थानच्या बुंदीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली (Boat Drowned In Chambal River). बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला. या घटनेत 25-30 जण बुडाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Boat Drowned In Chambal River).

या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 10 जण बेपत्ता आहेत. या बोटीत 14 मोटरसायकलही होत्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात झाली

माहितीनुसार, गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धाम जात असताना ही घटना झाली. यादरम्यान, अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. बचावकार्य सुरु आहे.

Boat Drowned In Chambal River

संबंधित बातम्या :

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली, सर्व सुखरुप

नंदूरबारमध्ये सहलीला आलेल्या 13 पर्यटकांची बोट उलटली, तिघांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *