नंदूरबारमध्ये सहलीला आलेल्या 13 पर्यटकांची बोट उलटली, तिघांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता

महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना घडली आहे (Boat over turned in Nandurbar).

नंदूरबारमध्ये सहलीला आलेल्या 13 पर्यटकांची बोट उलटली, तिघांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता

नंदूरबार : महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना घडली आहे (Boat over turned in Nandurbar). उच्छल येथे तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटल्याने 13 जण बुडाले. यातील तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. यातील 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर परिसरात घडली.

होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील एक कुटुंब सहलीसाठी आले होते. त्यांनी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी बोट घेतली. मात्र, बोटींग करत असताना भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आला आणि बोट अनियंत्रित झाली. त्यानंतर बोट उलटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

पर्यटकांची बोट बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं. मात्र, अंधार पडल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले आहेत. या अपघातात नवापूर तालुक्यातील दोन जणांचाही समोवश आहे.

यात एका मुलीचाही मृत्यू झाला आहे. अन्य 6 जण बेपत्ता असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. आज (10 मार्च) दुपारच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील बॅक वॉटरमध्ये भिंतखूद गावाच्या जवळ ही घटना घडली. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि सुरत येथील अग्नीशमन दलाचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे.

बोट बुडल्याने त्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात वाचवा-वाचवा असा आरडाओरड आल्याने गावाजवळील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारल्या. यात त्यांनी 6 जणांना वाचवलं. सुंदरपूर हे नवापूर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहेत. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समोवश आहे. ते देखील बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाने दिली.

संबंधित बातम्या :

सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर

Boat over turned in Nandurbar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *