AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : लाखोंच्या नफ्याचं आमिष दाखवून व्यावसायिकाला 41 लाखांना लुबाडलं, 3 पिता पुत्रांवर गुन्हा दाखल

Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाला 41 लाखांना लुबाडण्यात आल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात लाखोंचा फायदा करून देतो असे आमिष दाखवून शिपिंग व्यावसायिक अनिस खान यांची फसवणूक करण्यात आली आहे.

Mumbai :  लाखोंच्या नफ्याचं आमिष दाखवून व्यावसायिकाला 41 लाखांना लुबाडलं, 3 पिता पुत्रांवर गुन्हा दाखल
fraud caseImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 15, 2026 | 7:08 PM
Share

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील एका व्यावसायिकाला 41 लाखांना लुबाडण्यात आल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात लाखोंचा फायदा करून देतो असे आमिष दाखवून शिपिंग व्यावसायिक अनिस खान यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अनिस खान यांच्या तक्रारीवरून जे जे मार्ग पोलीस ठाण्यात झाकिरुद्दीन सय्यद, त्यांची मुले शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

41 लाखांची फसवणूक

समोर आलेल्या माहितीनुसार, शिपिंग व्यावसायिक अनिस खान यांना झाकिरुद्दीन सय्यद आणि त्यांची मुले शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यद यांनी अनिस खान यांच्याकडून व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली तब्बल 41 लाख रुपये घेतले. 41 लाखांच्या बदल्यात त्याच्या व्याजस्वरूपात 20 लाख अधिकचे देण्याचे आमिष दिले होते. मात्र काही काळानंतर अनिस खान यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. जाकीरुद्दीन खानवर पुण्यातल्या ओतूर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या झाकीरुद्दीन सय्यदवर पुण्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अनिस खान यांनी तक्रारीत काय म्हटले?

अनिस खान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘माझी अक्फा कॉपोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची सर्विस प्रोव्हाडर कंपनी आहे. ही कंपनी मी माझ्या घरातून ऑपरेट करतो. या व्यवसायातून येणारा नफा हा मी नेहमी गुंतवणूकदारांना देवून त्यांच्या कडून फायदा कमवण्याचा प्रयत्न करत. सन 2024 मध्ये माझा तसेच माझे जावई फारुख यांच्या ओळखीचा व्यवसायिक व अल्फा लाईफ आर्च या कंपनीचे मालक झाकिरुद्दीन गफफार सय्यद व त्यांची दोन मुले शहबाज सय्यद, जबिल सय्यद यांनी आम्हाला एक स्कीम दिली होती. त्यांनी आम्ही जेवढी रक्कम त्यांना गुंतवणूक म्हणून देणार त्याच्या 50 टक्के आगाऊ रक्कम पुढील 3 महिन्यामध्ये आम्हाला मिळेल अशी प्रलोभन आम्हाला दाखवली.’

पुढे तक्रारीत अनिस खान यांनी म्हटले की, ‘आम्ही सय्यद आणि त्यांच्या दोन मुलांवर विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीच्या नावाने 40,00,000 रुपये व्यवसायिक कर्ज देण्याचे ठरवले. नमूद करारमध्ये बरेच अटी व शर्ती असून त्यामध्ये एक अट अशी आहे की, झाकिरुद्दीन जर नमूद सर्व रक्कम दिली नाही तर झाकिरुद्दीन यांच्या विरोधात फौजदारी दावा करण्यात येईल. त्यानंतर मी माझ्या खात्यातून झाकिरुद्दीन सय्यद यांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर आम्ही त्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी टाळाटाळ केली. आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.’

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?