शिंदेंची नजर मुंबई बँकेवर, नव्या राजकीय समीकरणांची शक्यता..

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तूफान चर्चा आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही निवडणूक होऊ शकते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या निवडणुकीत समोरासमोर येण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांकडून मिळतंय.

शिंदेंची नजर मुंबई बँकेवर, नव्या राजकीय समीकरणांची शक्यता..
Mumbai District Central Cooperative Bank election
| Updated on: Aug 31, 2026 | 10:10 AM

प्रतिनिधी निवृत्ती बाबर : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार क्षेत्रात आमनेसामने येण्याची शक्यता दिसतंय. शिंदे यांच्या शिवसेनेचा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. ज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आमने सामने येऊ शकतात. मुंबई बँकेवर सध्या भाजप आणि फडणवीस समर्थकांचे वर्चस्व आहे. शिंदे गट उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी करत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. भाजपाचे तिथे वर्चस्व आहे. त्यात शिंदे गटही या निवडणुकीची तयारी करत आहे.

मुंबई बँक इतकी महत्त्वाची का?

महाराष्ट्रातील सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक संस्था नाहीत, तर राजकीय प्रभावाची केंद्रे मानली जातात. मुंबईतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना बँकेकडून आर्थिक मदत दिली जाते. विशेषतः सेल्फ-रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी मुंबई बँकेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे कर्ज मंजुरी आणि आर्थिक व्यवहारांमधून मोठे नेटवर्क तयार होण्याची शक्यता. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि सार्वजनिक संस्थांच्या ठेवी हाताळल्यामुळे बँकेचे आर्थिक महत्त्व मोठे आहे.

कर्ज आणि अॅडव्हान्सची रक्कम सुमारे 6437 कोटी रुपये असल्याचा दावा आहे. दरवर्षी 600 ते700 कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप केले जाते. दरेकरांच्या गडाला थेट शिंदेंचे आव्हान आहे. 2021 मध्ये प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने मुंबई बँकेच्या संचालक मंडळावर क्लीन स्वीप केला होता. 2021 मध्ये प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने मुंबई बँकेच्या संचालक मंडळातील सर्व 21 जागांवर विजय मिळवला होता.

या विजयानंतर मुंबई बँकेवरील दरेकरांचा प्रभाव आणखी मजबूत झाला. आता शिंदे गट थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने दरेकरांच्या वर्चस्वाला आव्हान मिळणार असल्याचे जाहीर आहे. भाजप-शिवसेना महायुतीत असतानाही सहकार क्षेत्रात शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे. आगामी निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व. आताच्या संचालक मंडळात अनेक पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये आमदार सुनील राऊत, तेजस्विनी घोसाळकर यांचा देखील समावेश आहे.

Follow Us