…अन्यथा मोठ्या आंदोलनाचे स्वरुप; ‘त्या’ उपोषणावरुन फडणवीसांचा सरकारला अल्टिमेटम

| Updated on: Feb 24, 2021 | 3:29 PM

हू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाची दखल घ्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (devendra fadnavis hunger strike samarjitsinh ghadate)

...अन्यथा मोठ्या आंदोलनाचे स्वरुप; त्या उपोषणावरुन फडणवीसांचा सरकारला अल्टिमेटम
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Follow us on

कोल्हापूर :शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या उपोषणाची दखल घ्या. अन्यथा या मोहिमेला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही,” असा गंभीर इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. ते कोल्हापुरात बोलत होते. (Devendra Fadnavi criticizes maharashtra government on hunger strike of Samarjit Singh Ghatge)

शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांचे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी यासाठी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला फडणवीसांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना, “सरकारच्या मोघलाई विरोधात समरजितसिंह घाटगे यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने घाटगे यांच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा या मोहिमेला व्यापक स्वपरुप यायला वेळ लागणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीजबिल यावर समरजितसिंह घाटगे यांनी 24 फेब्रुवारीपासून कोल्हापुरात उपोषणाची सुरुवात केली आहे. मात्र, असूनही या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या आंदोलनाला घेऊन सरकारवर टीका केली आहे. त्यांनी घाटगे यांच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा असल्याचं म्हटलं. तसेच, सरकारने त्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर या मोहिमेला मोठ्या आंदोलनाचे स्वरुप यायला वेळ लागणार नाही, असा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंशी पत्र व्यवहार

वीजबिल आणि कर्जमाफी संदर्भात घटगे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्र व्यवहार करणार असल्याचं म्हटलं होतं. घाटगे यांनी शाहू जनक घराण्याच्या सुवास संवाद यात्रेच्या माध्यमातून जिल्हाभर दौरा केला होता. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत वीजबिल, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, या प्रश्नावरुन उपोषण करणार असल्याचं 17 फेब्रुवारी रोजी जाहीर केलं होतं.

समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

समरजितसिंह घाटगे हे कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजित घाटगे यांनी विक्रमी मतांनी जिकली होती. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बॅंक आणि कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळवले.

इतर बातम्या :

जनक घराणे आक्रमक, समरजितसिंह घाटगे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली आंदोलन करणार

(Devendra Fadnavi criticizes maharashtra government on hunger strike of Samarjit Singh Ghatge)