जनक घराणे आक्रमक, समरजितसिंह घाटगे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली आंदोलन करणार

दिवसभर भर उन्हात शाहू पुतळ्यासमोर बसून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचं घाटगेंनी सांगितलं. (Samarajitsingh Ghatge protest in Kolhapur )

जनक घराणे आक्रमक, समरजितसिंह घाटगे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली आंदोलन करणार
शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 2:23 PM

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे पुन्हा एकदा आक्रमक झालं आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसण्याचा इशारा शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे (Samarajitsingh Ghatge) यांनी दिला. (Samarajitsingh Ghatge to protest in Kolhapur beneath Shahu Maharaj Statue)

वीज बिल आणि कर्जमाफीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पुढच्या बुधवारी म्हणजेच 24 फेब्रुवारीला सकाळी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

दिवसभर उन्हात आंदोलन करणार

समरजितसिंह घाटगे यांनी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवसभर भर उन्हात शाहू पुतळ्यासमोर बसून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचं घाटगेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंशी पत्र व्यवहार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी घाटगे आज यासंदर्भात पत्र व्यवहारही करणार आहेत. याआधी समरजितसिंह घाटगे यांनी शाहू जनक घराण्याच्या सुवास संवाद यात्रेच्या माध्यमातून जिल्हाभर दौरा केला आहे. समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत वीज बिलं, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर

याआधी, कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध व्यथा जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या जनक घराण्याने जनपंचायत अभियान सुरु केलं होतं. या अभियानांतर्गत समरजितसिंह घाटगे (Samarajitsingh Ghatge) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

समरजितसिंह घाटगे हे कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजित घाटगे यांनी विक्रमी मतांनी जिकली होती. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बॅंक आणि कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळवले. (Samarajitsingh Ghatge to protest in Kolhapur beneath Shahu Maharaj Statue)

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणार्‍या उमेदवारांना पाठबळ देत विजय मिळवून दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कागल तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कागल – कोल्हापूर भागातील एक युवा आणि खंबीर नेतृत्व ही समरजितसिंह घाटगे यांची ओळख आहे.

पाहा व्हिडीओ : बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक, समरजितसिंह घाटगेंचा पुढाकार

संबंधित बातम्या :

50 हजार शेतकऱ्यांची पत्रे, समरजितसिंह घाटगे राज्यपालांच्या भेटीला

बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक, समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर

(Samarajitsingh Ghatge to protest in Kolhapur beneath Shahu Maharaj Statue)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.