AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक, समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वाढीव वीज बिल, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अशा व्यथा समरजितसिंह घाटगेंसमोर मांडल्या

बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक, समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM
Share

कोल्हापूर : कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध व्यथा जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या जनक घराण्याने जनपंचायत अभियान सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे (Samarajitsingh Ghatge) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकणार आहेत. (Samarajitsingh Ghatge meets Kolhapur farmers in Jan Panchayat Campaign)

सात आठवडे चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात आज (शुक्रवार 6 नोव्हेंबर) करवीर तालुक्यातील चिंचवाड इथून झाली. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वाढीव वीज बिल, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अशा अनेक व्यथा मांडल्या.

सत्तेत येण्याआधी केलेली मागणी सत्तेत आल्यावर पूर्ण करा. प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान जाहीर करुन चार महिने झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, दरवाढ मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्यांकडे घाटगे सरकारचं लक्ष वेधणार आहेत.

आपली सरकारकडे काही वेगळी मागणी नाही, फक्त राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलं आहे. या अभियानाची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराही यावेळी घाटगे यांनी दिला.

दरम्यान, शाहू जनक घराण्यांच्या वंशजांनी थेट बांधावर येऊन संवाद साधल्यानं शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं. आपल्या व्यथा आता सरकार दरबारी पोहोचतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

समरजितसिंह घाटगे हे कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजित घाटगे यांनी विक्रमी मतांनी जिकली होती. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बॅंक आणि कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळवले. (Samarajitsingh Ghatge meets Kolhapur farmers in Jan Panchayat Campaign)

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणार्‍या उमेदवारांना पाठबळ देत विजय मिळवून दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कागल तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कागल – कोल्हापूर भागातील एक युवा आणि खंबीर नेतृत्व ही समरजितसिंह घाटगे यांची ओळख आहे.

पाहा व्हिडीओ : बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक, समरजितसिंह घाटगेंचा पुढाकार

संबंधित बातम्या :

50 हजार शेतकऱ्यांची पत्रे, समरजितसिंह घाटगे राज्यपालांच्या भेटीला

संजय घाटगेंच्या एबी फॉर्मने कोल्हापुरात भाजपला धक्का, राजे गटात अस्वस्थता  

(Samarajitsingh Ghatge meets Kolhapur farmers in Jan Panchayat Campaign)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.