
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. एका शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर फक्त एकच मोठा स्फोट झाला नाही तर चार ते पाच मोठी स्फोट झाली. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे अजित पवार यांचे विमान कोसळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांचे अशाप्रकारे निधन होईल, याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. लोकांना विश्वास बसत नाहीये की, अजित पवार आपल्यात नाहीत. अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी सुरू आहे. गंभीर आरोप केली जात असून विविध संशय व्यक्त केली जात आहेत. अजित पवार VSR कंपनीच्या विमानाने निघाले होते. VSR कंपनीच्या विमानात काही तांत्रिक बिघाड असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. आता DGCA चा ऑडिट रिपोर्ट पुढे आला असून यातून धक्कादायक माहिती पुढे आलीये
DGCA ने विमान कंपनी VSR वर कारवाई केली. DGCA ने आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले की, लिअरजेट विमानांचं उड्डाण थांबवले जाणार आता ही विमानाने उड्डाण करू शकणार नाहीत. DGCA ने लिअरजेटच्या 45 विमानांचा अहवाल दिलाय. यातील धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते.
लिअरजेट 45 विमानाने नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन केले ही मोठी बाब तपासात उघडकीस झाली. नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते. गैर-अनुपालन आणि देखभाल प्रक्रियांमध्येही मोठी त्रुटी आढळून आली, ही धक्कादायक बाब आहे, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर हा DGCA चा हा ऑडिट रिपोर्ट आल्याने सर्वांनाच धक्का बसला.