महिला सशक्तीकरणाची ऐशीतैशी, सरपंचपद महिलेला आरक्षित पण दावाच नाही !

| Updated on: Feb 17, 2021 | 10:54 AM

(Dhule Gram Panchayat Sarpanch Reserved)

महिला सशक्तीकरणाची ऐशीतैशी, सरपंचपद महिलेला आरक्षित पण दावाच नाही !
धुळ्यातील महाळपूर ग्रामपंचायत
Follow us on

धुळे : धुळे जिल्ह्यातील महाळपूर गावात सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या जागेवर एकाही महिलेने सरपंच पदासाठी दावा केला नाही. त्यामुळे एकमुखाने निर्णय घेऊन उपसरपंचच 5 वर्ष गावाचा कारभार हाकणार आहेत. (Dhule Mahalpur Gram Panchayat Sarpanch Reserved for female no claim)

धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडही झाली आहे. तर 18 फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

एकाही महिलेचा सरपंचपदासाठी दावा नाही

काही ठिकाणी पाहिजे ते आरक्षण जाहीर न झाल्याने अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. असंच चित्र शिंदखेडा तालुक्यातील महाळपूर गावी दिसून आलं. महाळपूर ग्रामपंचायतीसाठी सात सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात चार महिला आणि तीन पुरुष निवडून आले. या गावासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले होते, मात्र एकाही महिलेने सरपंचपदासाठी दावा दाखल केला नव्हता.

उपसरपंचांकडे कारभार

अखेर सर्व सदस्यांनी एकमुखाने उपसरपंचपदी विराजमान झालेले जितेंद्र सुभाष पाटील यांना सर्व अधिकार देत गावाच्या विकासाचा अजेंडा पुढे केला आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशी घटना घडली असून सर्वत्र या ग्रामपंचायतीचे कौतुकही केले जात आहे. (Dhule Gram Panchayat Sarpanch Reserved)

तंटामुक्तीसाठी गावाची ओळख

सर्वसाधारण या गावाची लोकसंख्या 1250 असून सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदत असतात. तंटामुक्ती म्हणून या गावाची देखील ओळख आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ एकोप्याने राहत असून एकमुखाने सर्व सदस्यांनी महाळपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर विराजमानपदी जितेंद्र सुभाष पाटील यांची निवड करुन सर्व अधिकार देत गावाच्या विकासाचा अजेंडा त्यांच्या पुढे ठेवला आहे.

पाच वर्ष उपसरपंच आमच्या गावाचा विकास करेल. मध्यंतरी सरपंच पदाची निवडणूक लागली तरी आम्ही निवडणूक लागू देणार नाही अशी प्रतिक्रिया देखील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहेत.

संबंधित बातम्या :

बहुमत असतानाही भाजपनं इंदापूरच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमावली! कारण काय?

संसाराचा गाडा आणि ग्रामपंचायतीचा कारभारही सोबतीने, सरपंचपदी पती, उपसरपंच पत्नी

(Dhule Mahalpur Gram Panchayat Sarpanch Reserved for female no claim)