धुलीवंदनाचा रंग पडला फिका, रंग खेळताना मुंबईत अनेक जखमी, रुग्णालयात सुरू उपचार

मुंबईत धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली असली तरी, अनेक ठिकाणी रंगांच्या खेळात दुखापती झाल्या. डोळ्यांत रंग गेल्याने, पाणी भरलेल्या फुग्यांनी मार लागल्याने किंवा त्वचेवर पुरळ आल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सायन, नायर, केईएम रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू होते. उत्सवाच्या उत्साहात सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनांनी अधोरेखित केले.

धुलीवंदनाचा रंग पडला फिका, रंग खेळताना मुंबईत अनेक जखमी, रुग्णालयात सुरू उपचार
धुलीवंदन
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 04, 2026 | 8:13 AM

होलिका दहन झाल्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल धुळवड साजरी करत रंग खेळण्यात आले. मुंबईतही रंगोत्सवाचा मोठा उत्साह दिसला. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, ऑपीस कलिग्ज यांच्यासह अनेकांनी मुंबईत काल रंग खेळण्याचा आनंद लुटला. सुट्टीमुळे अेक जण बरेच तास रंगात नाहून निघाले, खाणं-पिणं, मजा करताना दिसले. मात्र धुळवडीचा रंग काही ठिकाणी फिका झालेला दिसला तो दुर्घटनांमुळे. मिळालेल्या माहितीनुसार, काल धुळवडीच्या उत्सवात मुंबईत ठिकठिकाणी अनेक लोक जण जखमी झाले. त्यांच्यापैकी काही जखमींना मुंबईतील सायन रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम या रुग्णालयांत (एकूण 18) दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयात अनेकांवर उपचार

राज्यात सकाळपासूनच धुळवडीची धूम सुरू होती. अनेकजण कुटुंबासोबत घरातच धुळवड साजरी करताना दिसले. काहींनी मात्र मित्र-मैत्रिणींसोबत रंगाचा आनंद लुटला. मात्र त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे अनेकांचा धुळवडीचा उत्साह, सणांचा रंग फिका पडल्यासारखं झालं. मुंबईत ठिकठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मुंबईकर मोठ्या उत्साहाने सामील झाले खरे. पण डोळ्यांत रंग गेल्याने, तसेच पाणी भरलेल्या पिश्व्या, फुगे हे फेकून मारल्यावर अंगावर त्याचा फटका बसल्याने काहींन दुखापत झाली. तर काही लोकांना रंगामुळे, त्वचेवर पुरळ आल्याने अस्वस्थ वाटू लागलं. या सर्व नागरिकांना तातडीने रुग्णालात दाखल करून त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

डोळ्यांत गेला रंग, पाठीला मार

केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पाच जखमी रुग्ण दाखल झाले होते. यापैकी अवधूत घावस्ते या 12 वर्षांच्या मुलाच्या पाठीच्या वरच्या भागाला मार लागला. तर देवांश थोरात (5 वर्षे) याच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आलं अशी माहिती समोर आली. तसेच आरोही कुमार (6 वर्षे) हिच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मार लागला, तर संदीप वारबडेकर (50 वर्षे) यांना पाणी भरलेल्या फुग्याचा मार लागल्याने त्यांच्या मांडीला, तर खनक जैन (10 वर्षे) च्या डोळ्याला दुखापत झाली. डोळ्यांत गेलेला रंग, त्वचेची जळजळ होणं अशा अनेक तक्रारींस रुग्ण दाखल झाले. त्यापैकी 6 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. तर नायर रुग्णालयात दाखल झालेल्या काही रुग्णांच्या डोळ्यांना, तर काहींच्या डोक्याला दुखापत झाली. एकाचे तर दातच पडले, असेही समजते.

Follow Us