
मुंबई : औरंगजेब बादशाहाचा खरा इतिहास (History) दाखविल्यास कोणताही हिंदू नाराज होणार नाही. औरंगजेब मुसलमान होते. त्यांनी कधी हिंदू-मुसलमान यांच्यात लढाई केली नाही. असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलं. अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयी पुन्हा एकदा गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणाले, औरंगजेबाचा इतिहास मी वाचला आहे. त्यांचा शिपाई हिंदू होता. बनारसमध्ये हिंदूंनी तयार केलेली मश्जिद आहे.
काही लोकं औरंगजेबाला शिव्या देतात. त्यांचा विरोध करतात, असं अबू आझमी यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता.
औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगरच्या नामांतराची गरज काय असा सवाल अबू आझमी यांनी केला होता. ही तीन नावं मुस्लीम आहेत. या नावांना हटवून राज्यातील जनतेला नोकरी मिळणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
तीन जिल्ह्यांची नावं इतकी वर्षे सुरू आहेत. नाव बदलल्यानं काही विकास होणार नाही. नाव बदलल्यानं गरिबी दूर होणार नाही. नाव बदलल्यानं बोर्ड बदलण्यासाठी खूप मोठा खर्च होणार आहे.
औरंगजेबाच्या कौतुकानंतर अबू आझमी यांना धमकीचा फोन आला. शिंदे-फडणवीस सरकारनं माझी सुरक्षा कमी केल्याचा दावाही अबू आझमी यांनी केलाय.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना सुरक्षा होती. तरीही त्यांचा ठार करण्यात आले. मी तर सामान्य व्यक्ती असल्याचं अबू आझमी म्हणाले. पण, मी थांबणार नाही. जे खरं आहे ते बोलणार. मी हिंदू-मुस्लीम यांच्यात एकी व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.