ऐन निवडणुकीत महायुतीत एकमेकांवर कुरघोड्या? शिंदे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत, भाजपची डोकेदुखी वाढली

ऐन निवडणुकीत महायुतीत एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे पुण्यात शिंदे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

ऐन निवडणुकीत महायुतीत एकमेकांवर कुरघोड्या? शिंदे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत, भाजपची डोकेदुखी वाढली
eknath shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 9:49 AM

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील घटकपक्षांना काही प्रमाणात बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे. परंतु काही जागांवर बंडोखरी कायम असल्याचे दिसत आहे. या बंडखोरीमुळे ऐन निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमधील तिन्ह पक्ष एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे .

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. राज्यातील एकूण पाच जागांवर काही ठिकाणी महायुतीत बंडखोरी निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला आहे. तिन्ही पक्ष एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमरावतीमुळे पुणे शिक्षक आणि संभाजीनगरमध्ये युतीत बिघाडी निर्माण झाली आहे. अमरावतीत भाजपचे बंडखोर उभे राहिले आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. तर अमरावतीत राष्ट्रवादी कांग्रेसने शिवसेनेला मदत केली तर संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी कांग्रेसला शिवसेना मदत करणार असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. यामुळे अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. अमरावतीत बंडखोरांना शमवण्यासाठी शिवसेनेकडून दबाव वाढला आहे. तर याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत आज अमरावती दौऱ्यावर आहेत.

Loading...

अमरावतीत वंचितच्या उमेदवाराला न्यायालयाचा दणका

अमरावती शिक्षक मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराला उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. मोहम्मद गाझी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी आल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देत नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मतपत्रिका छपाई पूर्ण झाल्याने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मर्यादा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. वंचितचे उमेदवार मोहम्मद गझी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळल्याने उमेदवाराला मोठा धक्का बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us