Pooja Chavan | “पूजाची आठवण मरु देणार नाही, तिचा पुतळा उभारणार”, पूजाच्या वडिलांचा निर्धार

| Updated on: Feb 17, 2021 | 9:17 PM

ती गेली तरी तिची आठवण आमच्या मनात असेल. आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत,” असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटंलय. (Pooja Chavan build statue Lahu Chavan)

Pooja Chavan | पूजाची आठवण मरु देणार नाही, तिचा पुतळा उभारणार, पूजाच्या वडिलांचा निर्धार
पूजा चव्हाण आणि लहू चव्हाण
Follow us on

बीड : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आपला तपास अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर केला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण तीन तपास पथके कार्यरत आहेत. तर दुसरीकडे पूजाचे कुटुंबीय तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरु शकले नाहीत. पूजा चव्हाण आज नसली तरी, तीची आठवण मरु न देण्याचं तिच्या घरच्यांनी ठरवलं आहे. पूजेचे कुटुंबीय पूजाचा पुतळा उभारणार आहेत. या विषयी बोलताना “दिवस मागे पडत आहेत. मात्र, आम्हाला पूजाची आठवण मरु द्यायची नाही. ती गेली तरी तिची आठवण आमच्या मनात असेल. आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत,” असे पूजाचे वडील लहू चव्हाण (Lahu Chavan) यांनी म्हटंलय. ते ‘’टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (family of Pooja Chavan will build the statue of her said her father Lahu Chavan)

पूजाचा पुतळा उभारणार

यावेळी बोलताना, पुजाचे वडील भावूक झाले होते. ते म्हणाले, “आमच्या घरच्यांची एकच इच्छा आहे. की तिची आठवण राहायला पाहिजे. आमचं ठरलं आहे की तिचा पुतळा बनवायला पाहिजे. काहीही प्रयत्न करुन आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत. परिस्थिती वाईट असल्यामुळे काही अडचणी येत आहेत. पण बँकेने लोन मंजूर केले आहे. आमच्या सर्व कुटुंबाने ठरवलं आहे. आम्हाला तिची आठवण मरु द्यायची नाही. ती जरी गेली असली तरी ती आमच्या मनात असणार आहे, आम्ही पूजाचा पुतळा उभारणार आहोत.”

पूजाच्या वडिलांची प्रतिक्रिया :

सरकारने धीर दिला असता तर…

यावेळी बोलताना लहू चव्हाण यांनी पूजाच्या मत्यूबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले. पूजाने कर्जामुळे आत्महत्या केली असावी असा अंदाज तिच्या वडिलांनी यापूर्वी व्यक्त केला होता. हाच धागा पकडत त्यांनी सरकारने कर्जमाफीबद्दल थोडाजरी धीर दिला असता, तर ही वेळ आली नसती असं वक्तव्य केलं. “कर्जामाफी संबंधी आम्ही कित्येक निवेदने दिले. कर्जमाफीसंदर्भात सरकारने व्याज माफ करतो किंवा अशा प्रकारचा काही धीर दिला असता, तर आमची पूजा गेली नसती. सध्या आमची खूप वाईट परिस्थिती आहे,” असे लहू चव्हाण म्हणाले.

इतर बातम्या :

डॉक्टर म्हणतात, तो मी नव्हेच?, मग पूजा अरुण राठोडवर उपचार कुणी केले?; उपचाराचंही गूढ वाढलं

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!

(family of Pooja Chavan will build the statue of her said her father Lahu Chavan)