डॉक्टर म्हणतात, तो मी नव्हेच?, मग पूजा अरुण राठोडवर उपचार कुणी केले?; उपचाराचंही गूढ वाढलं

पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. (pooja arun rathod was not may patient says dr. shrikant warade)

डॉक्टर म्हणतात, तो मी नव्हेच?, मग पूजा अरुण राठोडवर उपचार कुणी केले?; उपचाराचंही गूढ वाढलं


यवतमाळ: पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. तिचा गर्भापात करण्यात आलेल्या रिपोर्टवर डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव आहे. पण या रुग्णाला मी तपासले सुद्धा नाही असं सांगत वराडे यांनी हातवर केले आहेत. त्यामुळे पूजा अरुण राठोड या तरुणीवर उपचार कुणी केले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. (pooja arun rathod was not may patient says dr. shrikant warade)

पूजा अरुण राठोड या तरुणीने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गर्भपात करून घेतला होता. त्यासाठी ती 6 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी ती रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 3 आणि युनिट नंबर 2 मध्ये उपचार घेत होती.

ऑन कॅमेरा खुलासा

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टवर असोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ द युनिट म्हणून डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव आहे. तसेच वराडे यांनी या रुग्णावर उपचार केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर सही नाही. डॉ. वराडे यांनीही शुक्रवारचं अॅडमिशन असल्याने माझं नाव आलं असेल पण या रुग्णावर मी उपचार केले नसल्याचं ऑन कॅमेरा स्पष्ट केलं आहे. वराडे यांनी जर या रुग्णावर उपचार केले नाही तर त्यांचं नाव पेपरवर कसं टाकण्यात आलं? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

चव्हाणच  माहिती देतील

युनिट दोनचे विभागप्रमुख हे डॉ. रोहिदास चव्हाण आहेत. त्यांनी सोमवारी रजेचा अर्ज दिला होता. त्यांची सुट्टी संपली आहे. तेच तुम्हाला या रुग्णाबाबतची डिटेल्स माहिती देतील असं वराडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पूजा राठोड नावाच्या तरुणीवर नेमके उपचार कुणी केले? असा सवाल केला जात आहेत.

 

दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचं नाव आलं आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे. तर पुण्यात आत्महत्या करणारी पूजा चव्हाण आणि यवतमाळमध्ये गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड ही एकच आहे का? असा सवालही केला जात आहे. (pooja arun rathod was not may patient says dr. shrikant warade)

डिस्चार्जनंतर आत्महत्या?

पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये उपचार झाले. 6 फेब्रुवारी रोजी गर्भपात झाल्यानंतर 7 तारखेला तिला डिस्चार्ज मिळाला. त्याच दिवशी 7 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने पुण्यात रात्री दीड वाजता आत्महत्या केली. अरुण राठोड आणि कथित मंत्र्याच्या कथित व्हायरल क्लिपमध्ये पूजा उपचारानंतर आत्महत्या करणार आहे, असं अरुण मंत्र्याला सांगतो. त्यामुळे 7 तारखेला उपचार घेतल्यानंतर पूजाने आत्महत्या तर केली नाही ना? यवतमाळमधील उपचार घेणार पूजा आणि पुण्यात आत्महत्या करणारी पूजा एकच तर नाही ना? असे सवालही केले जात आहेत. मात्र, या कोणत्याही शक्यतेला पोलीस, पूजाचे कुटुंब, संशयित अरुण आणि कथित मंत्र्यांसह कुणीही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं आहे. (pooja arun rathod was not may patient says dr. shrikant warade)

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!

(pooja arun rathod was not may patient says dr. shrikant warade)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI