लॉकडाऊनचा फटका, रावणाचा पुतळा बनवणाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट

| Updated on: Oct 23, 2020 | 8:14 PM

मध्य भारतात मागील पाच पिढ्यांपासून रावणाच्या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या बिनवार परिवाराच्या मुख्य व्यवसायावरच कोरोनामुळे गदा आली आहे.

लॉकडाऊनचा फटका, रावणाचा पुतळा बनवणाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट
Follow us on

नागपूर : विजयादशमी उत्सवाला भारतीय संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. याच दिवशी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून देशभरात अनेक ठिकाणी रावणदहन केले जाते. परंतु यंदा कोरोनामुळे रावणदहन कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे रावणाचा पुतळा बनवणाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. (Financial crisis on artits who makes statue of Ravana for Vijayadashami Ravan Dahan event)

मध्य भारतात मागील पाच पिढ्यांपासून रावणाच्या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या बिनवार परिवाराच्या मुख्य व्यवसायावरच कोरोनामुळे गदा आली आहे. रावणाचा पुतळा निर्माण करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. केवळ नागपूरच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, मुंबई आणि दिल्लीतदेखील बिनवार यांनी बनवलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. मात्र यंदा रावणदहन कार्यक्रम नसल्याने त्यांच्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बिनवार कुटुंबातील सदस्य अमर बिनवार म्हणाले की, परिवाराचे पालन करण्यासाठी रोजगार हवा आहे. मात्र रावण निर्मिती सोडून इतर व्यवसाय केला तर रावण पुतळा बनविण्याची ही कला मध्य भारतातून संपून जाईल, अशी भीती वाटते. दसरा एक दिवसावर आला आहे, परंतु रावणाच्या पुतळ्याची ऑर्डर आलेली नाही. आम्ही हे काम केले नाही तर ही कला जिवंत राहणार नाही, या भीतीने अद्यापही तेच काम करत आहोत.

दरम्यान, रावण दहनाचा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, त्यामुळे ऑर्डर नाहीत. मात्र आपल्या संस्कृती मध्ये रावण दहणाला मोठं महत्त्व आहे, त्यामुळे ही कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा हे कलाकार करत आहेत

संबंधित बातम्या

बुधवार पेठेत कोरोना नाही, मात्र लॉकडाऊनचा फटका, आर्थिक मदतीसाठी पंतप्रधानांना पत्र

लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला लॉकडाऊनचा फटका, नांदेडमधील झेंडा उत्पन्नात तब्बल 60 टक्के घट

भेंडवळच्या भविष्यवाणीला लॉकडाऊनचा फटका, 300 वर्षांची परंपरा खंडित

(Financial crisis on artits who makes statue of Ravana for Vijayadashami Ravan Dahan event)