लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला लॉकडाऊनचा फटका, नांदेडमधील झेंडा उत्पन्नात तब्बल 60 टक्के घट

लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वज हा नांदेडमध्ये तयार केला जातो (Marathawada Khadi Gramodyog Center).

लाल किल्ल्यावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला लॉकडाऊनचा फटका, नांदेडमधील झेंडा उत्पन्नात तब्बल 60 टक्के घट

नांदेड : लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वज हा नांदेडमध्ये तयार केला जातो (Marathawada Khadi Gramodyog Center). त्यामुळे याचा नांदेडकरांना विशेष अभिमान आहे. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदा राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राचे दरवर्षीच्या तुलनेत साठ टक्के उत्त्पन्न कमी झालं आहे. लॉकडाऊन आणि वाहतूक व्यवस्था नसल्याने देशभरातून राष्ट्रध्वजाची मागणी घटली आहे (Marathawada Khadi Gramodyog Center).

पूर्ण देशभरात नांदेड आणी कर्नाटकातील हुबळी या दोनच जागी राष्ट्रध्वजाची निर्मिती होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड केंद्रात राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या केंद्राने राष्ट्रध्वज तयार करून ठेवले. मात्र कोरोनामुळे मागणीच नसल्याने हे केंद्र अडचणीत आले आहे.

“आपल्या नांदेडचे भूषण म्हणजे मराठवाडा खादी ग्रामद्योग केंद्रात तयार होणारा राष्ट्रध्वज आहे. देशात फक्त दोन ठिकाणी राष्ट्रध्वज तयार केले जातात. एक म्हणजे कर्नाटकातील हुबळी येथे आणि महाराष्ट्रात नांदेडमध्ये तयार केले जातात. नांदेडमधून आतापर्यंत आपण 16 प्रातांमध्ये ध्वज पाठवतो. आपल्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा नांदेडमध्ये तयार केलेला राष्ट्रध्वज फडकतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मराठवाडा खादी ग्रामद्योग समितीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे. पण यावेळी कोरोनामुळे या केंद्राचे उत्पन्न घटलं आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 76 लाख उत्पन्न होते आणि यावेळी केवळ 34 लाख उत्पन्न आहे. त्यामुळे 60 टक्के उत्पन्न कमी झालं आहे”, असं मराठवाडा खादी ग्रामद्योग केंद्राचे व्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी सांगितले.

“यावर्षी ध्वज नियोजनाप्रमाणे आम्ही तयार केले आहेत. इथे काम करणारे कामगार इथेच राहत असल्याने कोरोना आणि लॉकडाऊनचा ध्वजाच्या निर्मितीवर काही परिणाम झाला नाही. पण वाहतुकीमुळे यावेळी ध्वजाची मागणी कमी आली. त्यामुळे ध्वजाचे उत्पन्न यावेळेस कमी झालेले आहे”, असंही अरुण किनगावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवला

Corona Update | 15 ऑगस्टपर्यंत कोरोना लस आली पाहिजे- ICMR

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *