माजी मुख्यमंत्र्यांचा मैत्रीचा चहा…फडणवीस यांची अशी ही एक मैत्री

| Updated on: May 20, 2022 | 8:51 PM

त्यावेळीही ते तेथे गेले आणि नरसिंहपुर येथे आपल्या कुलदैवताची पुजा केली. या पूजेनंतर फडणवीस मंदिरातून बाहेर जात असताना फडणवीस राऊत यांच्या टपरी वजा हॉटेलात जात चहा घेतला.

माजी मुख्यमंत्र्यांचा मैत्रीचा चहा...फडणवीस यांची अशी ही एक मैत्री
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
Follow us on

इंदापूर : राजकारणात (Politics) कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू. पण असेही म्हटले जाते की, राजकारण्यांची मैत्री ही नको आणि दुश्मणी ही. कारण हे कधीच कोणाच्या उपयोगी पडत नाहीत. तर कोणाला आठवणीत ही ठेवत नाहीत. मात्र याबाबत काही राजकीय व्यक्तीमत्व ही अपवाद असतात. त्याततीलच एक नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis). ते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते असले तरीही मैत्रीसाठी इंदापूरला हे जातातच. आता तु्म्हाला वाटलं असेल की ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलांना भेटायला जात असतील. मग यात काय वेगळं आहे. पण फडणवीस हे त्यांना नाही तर टपरी वरचा चहा (Tea on Tapri) पिण्यासाठी इंदापूरला जातात. आश्चर्य वाटलं असेल ना? हो ते तेथे चहा पिण्यासाठी जातात. तेही आपल्या चहावाल्या दशरथ राउत यांच्या मैत्री खातर.

कृष्णा-सुदामापासून मैत्रीचे किस्से

सत्तेचा डामडौल कायम नसतो. पदे येतात आणि जातात. मात्र मैत्रीचे नाते कायम टिकते. मैत्रीमध्ये गरिब-श्रीमंत, उच्च-कनिष्ठ असा भेद नसतो. कृष्णा-सुदामापासून मैत्रीचे किस्से आपण ऐकत आलो आहोत. अशीच काहीशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर इथल्या चहावाले दशरथ राउत यांची मैत्री आहे. त्यामुळे इंदापूर आणि बारामती परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. तर पदाला न जुमानता माजी मुख्यमंत्री न चुकता या चहावाल्याचा चहा पिल्याशिवाय जात नाहीत.

फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत

देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेलं व्यक्तिमत्व आहे. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध पदे भूषवली आहेत. आज ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र त्यांचे जुन्या कालापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचं येथे दिसून येतं. इंदापूर तालुक्यातल्या नीरा नरसिंहपूर या गावी असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत आहे. येथे ते वर्षातून एकदा तरी सह कुटुंबिय दर्शनासाठी जातातच. त्यावेळीही ते तेथे गेले आणि नरसिंहपुर येथे आपल्या कुलदैवताची पुजा केली. या पूजेनंतर फडणवीस मंदिरातून बाहेर जात असताना फडणवीस राऊत यांच्या टपरी वजा हॉटेलात जात चहा घेतला.

हे सुद्धा वाचा

जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय

यावेळी फडणवीस म्हणाले, मी माझ्या कुलदैवताला नेहमीच येथे येत असतो. गेल्या 25 वर्षांपासून हे करत आहे. त्यामुळे येथे मंदिरासमोर असणाऱ्या हॉटेल चालवणाऱ्या दशरथ राउत यांच्याशी परिचय झाला आहे. त्या परिचयाचे आता मैत्रीत रूपांतर झाले आहे. मी नगरसेवक होतो तेव्हापासून आता पर्यंत तेंव्हापासून आजतागायत माझ्यात आणि राउत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळंच मी आज विरोधी पक्ष नेता पदावर असतानाही राऊत यांचा चहा पिणं सोडलेलं नाही. यातूनच मैत्रीचं जीव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे.