दुपारी लस्सी पिण्यासाठी जात होते, मोटरसायकलला वाहनाची धडक, चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वरणगावजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेसह चौघा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुपारी लस्सी पिण्यासाठी जात होते, मोटरसायकलला वाहनाची धडक, चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू
road accident
| Updated on: Jun 05, 2026 | 7:55 PM

दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लस्सी पिण्यासाठी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघा जणांचा भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका महिला आणि तिच्या अवघ्या एक वर्षांच्या मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील रहिवासी असलेले फासे पारधी जमातीचे काही लोक वरणगाव परिसरात कपीलनगरात पत्र्याचे घर बांधून गेल्या २-३ महिन्यांपासून राहत होते. विजय शंकर काळे ( वय १९ ) हा त्याची मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले ( वय ३० ) आणि दोन लहान मुले विघ्नेश शंकर चव्हाण ( वय १४ ) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले ( वय १ ) असे चौघे जण दुपारी दुचाकीने लस्सी पिण्यासाठी वरणगाव येथे जात होते. गावाच्या पुढे एका भरधाव वाहनाने त्यांच्या मोटरसायकली जोरदार धडक दिल्यानंतर हे चौघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेत्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

मोटरसायकलीवरुन गावातील लोकांनी ओळखले

या परिसरातील काही लोकांनी दुचाकीला ओळखून त्यांच्या गावात माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना जळगाव जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Follow Us