समृद्धी महामार्गावर गॅसची पाईपलाईन लिक, प्रवाशांमध्ये भीती, वाहतूक बंद

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.  समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लिक झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

समृद्धी महामार्गावर गॅसची पाईपलाईन लिक, प्रवाशांमध्ये भीती, वाहतूक बंद
Samruddhi Mahamarg
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 9:19 PM

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.  समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लिक झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गॅस पाईपलाईन लिक झाल्याने महामार्गालगत पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू आहे. गॅस गळतीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर- मुंबई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४५१.२ येथे ही घटना घडली आहे. दरम्यान आता ही गॅस गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४५१.२ या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस पाईपलाईन लिक झाल्याने महामार्गालगत पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू आहे. यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गॅस गळतीमुळे या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक लासूर हडस पिंपळगाव टोलनाक्यावरून वळवण्यात आली आहे. गॅस गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  गॅस गळतीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान समृद्धी माहामार्ग कायमच या न त्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता गॅस लिक झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे या माहामार्गावर चोरीच्या देखील घटना घडत आहेत. दरोडेखोरांनी रात्रीच्यावेळी वाहनाचं टायर पंक्चर करून व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली आहे, त्यामुळे लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या माहामार्गावर अपघाताच्या घटना देखील घडतच असतात. आता गॅस लीक झाल्याची घटना घडली आहे.

पाईपलाईन लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू आहे, त्यामुळे वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. याचा वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होत असल्याने प्रचंड दुर्गंदी देखील या परिसरात पसरली आहे.

 

Follow Us