अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की

कथित शिवानी कळमेकर हत्याप्रकरणात कारागृहात असलेले तिचे वडील आणि भावाला आज शेगाव न्यायालयाने केले दोष मुक्त केले आहे. या शिवानीच्या हत्ये प्रकरणात बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र, शिवानी तिच्या प्रियकरासोबत हजर झाल्याने पोलिसांचा तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की
jalgaon jamod station
| Updated on: May 30, 2026 | 10:24 PM

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेची शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शिवानी कलमेकर हीच्या हत्या प्रकरणात तिचे वडील आणि भाऊ या बापलेकांना जामोद पोलीसांनी अटक केली. या नंतर ही शिवानी कलमेकर २२ दिवसांनी पोलिस ठाण्यात स्वत:च हजर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जळालेला मृतदेह नेमका कोणाचा असे कोडे पडले आहे. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता चार पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली करून थातूर मातुर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ पोलिसांवर कारवाई केव्हा होणार हा सवाल केला जात आहे. दरम्यान, शेगाव न्यायालयाने या बापलेकांची अखेर निर्दोष मुक्तता केली आहे.

मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हीच्या हत्ये प्रकरणात तिचे वडील बापुराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक केली होती. २६ एप्रिल रोजी जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात अर्धवट जळालेला मृतदेह शिवानी हीचा असल्याचे सांगून बापलेकांनी तिची हत्या केल्याचा ठपका जामोद पोलीसांनी ठेवला होता. शिवानी कळमेकर ही विवाहित असूनही तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जात असते यावरुन तिची हत्या करण्यात आली होती असा पोलिसांचा सुरुवातीचा तपास सांगत होता. मात्र, ज्यावेळी २२ दिवसांनी शिवानी कळमेकर आणि तिचा बॉयफ्रेंड जळगावच्या जामोद पोलिस ठाण्यात आला तेव्हा पोलिसांचे धाबे दणाणले.

बुलढाणा पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. २० दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं. या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला. विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता.

मध्य प्रदेशातील या मृत मुलीचे नाव शिवानी बापूराव कळमेकर असून तिचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असून ती विवाहित असूनही प्रियकराला भेटायला जात असल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणात जवळ आणून टाकला, अशी उकल जळगाव जामोद पोलिसांनी केली होती. याप्रकरणी स्वत:च्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकर हीचे वडील बापूराव कळमेकर तसेच भाऊ यांना अटक करून जेलमध्ये टाकले. मात्र, शिवानी कळमेकर जीवंत असून तिने तिच्या प्रियकरा सोबत बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठले होते. आपण जीवंत असल्याने आपल्या वडिलांना आणि भावाला चुकीची अटक झाल्याचे म्हटले होते.

बुलढाणा पोलिसांची सारवासारव…..!

आरोपींनी आमची दिशाभूल केली असून अनोळखी महिला असल्याने आम्ही त्या महिलेचे डीएनए सँपल FSL ला पाठवले आहेत. या प्रकरणात पुण्यामध्ये माहिती मिळाल्यानुसारच आम्ही कायदेशीर कारवाई केली.या आरोपींना अटक करणे क्रमप्राप्त असल्याने आम्ही त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केलेली आहे.यातील महिला जिवंत असल्याचं आम्हाला पोलिसांनी कळवलं आणि ती महिला जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आलेली आहे तिचा कबुली जबाब आम्ही घेत आहोत असे जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Follow Us