गोदामाईचा श्वास गुदमरतोय, पानवेली हटवा, नागरिकांची शासनाकडे मागणी

| Updated on: Dec 16, 2020 | 6:41 PM

पानवेलींमुळं नागरिकांचंच नाही तर गोदामाईचंही आरोग्य धोक्यात आलंय.

गोदामाईचा श्वास गुदमरतोय, पानवेली हटवा, नागरिकांची शासनाकडे मागणी
Follow us on

नाशिक : हिरव्यागार पानवेलीनं व्यापलेलं हे गोदावरीचं पात्र आहे. कदाचित हे दृश्यं डोळ्यांना बघायला सुंदरही वाटू शकतं, मात्र या पानवेलींमुळं नदीचा श्वास गुदरमरतोय. नदीत मासे दिसेनासे झालेत, पाण्याची अस्वच्छ होतंय आणि गावकऱ्यांना त्याचा भयानक त्रास होतोय.

या पानवेलींमुळं नागरिकांचंच नाही तर नदीचंही आरोग्य धोक्यात आलंय. परिणामी नदीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच याचा फटका बसणारेय. या पात्रापासून काहीच अंतरावर नांदूर-मध्यमेश्वरचं पक्षी अभयारण्य आहे. परदेशातून हजारो पक्षी इथं येतात. मात्र, आता पानवेलींनी नदीवर ताब्या घेतल्यानं, पक्ष्यांचं खाद्य कमी झालंय आणि त्यामुळंच आता अनेक पक्षी इथं दिसेनासे झालेत..

गोदावरीला दक्षिणेतली गंगा म्हटलं जातं, हिंदू धर्मियांसाठी गोदावरी अत्यंत महत्त्वाची… गोदामाईच्या पात्रात हजारो वर्ष जुनी हेमाडपंथी मंदिरं आहेत. पाणी आटल्यानंतर भाविक इथं दर्शनाला येतात. मात्र आता पानवेली या मंदिरांचा ताबा घेत आहेत. परिणामी मंदिरं कमकुवत होत चालली आहेत

पानवेलींच्या साम्राज्यामुळं परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. ग्रामस्थांनी अनेकदा जलसंपदा विभागांना याबाबतीत निवेदनं दिली आहेत. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. नदी वाचवायची असेल, पर्यावरण पुन्हा स्वच्छ करायचं असेल आणि पक्ष्यांचा किलबिलाट थांबवायचा नसेल तर या पानवेली तातडीनं हटवणं गरजेचंय. तरच ही जीवनदायिनी गोदावरी आणखी समृद्ध होईल…

हे ही वाचा

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतकरी देशोधडीला लागेल, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल