AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं, अत्यल्प पावसाने अनेक गावात अजूनही टँकरने पाणी

जायकवाडी धरणातून (Jayakwadi dam) गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होऊन अडीच महिने लोटले, मात्र मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला आहे.

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं, अत्यल्प पावसाने अनेक गावात अजूनही टँकरने पाणी
| Edited By: | Updated on: Aug 15, 2019 | 7:31 PM
Share

जालना : जायकवाडी धरणातून (Jayakwadi dam) गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होऊन अडीच महिने लोटले, मात्र मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यातील गावांत पाण्याचे टँकर सुरु आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी (Jayakwadi dam) म्हणजेच ‘नाथसागर’ यावर्षी तब्बल 91 टक्के भरलं आहे.

मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचं पात्रही कोरडं आहे. त्यामुळं अनेक गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरण 95 टक्के भरलं आहे. मात्र तरीही त्यातून पाणी सोडण्यात आलं नव्हतं.

अखेर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विनंती केल्यानंतर आज गिरीश महाजनांच्या आदेशानंतर गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलं.  त्यामुळं मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या काठावर असणाऱ्या सहाशे गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

त्याआधी नाशिकमधील नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून  गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत होतं, ते आज बंद करण्यात आलं. जवळपास महिनाभर हे पाणी सुरु होतं. गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कायगाव टोका इथे जायकवाडी धरणात मिळालं. त्यामुळे कायगाव टोका परिसरात जायकवाडी नदी परिसरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली होती.

यंदा जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही मृतसाठ्यात गेली होती, उणे 10.7 इतका धरणाचा पाणी साठा कमी झाला होता.  जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगरांसह सहाशे गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशिक परिसरात कोसळत असलेल्या धुव्वादार पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असली, तरी मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण, जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्याचा छोटा समुद्र

60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

नाथसागरावर अवलंबून क्षेत्र

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.

औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

जायकवाडी धरणात सध्या 33926 क्युसेकने आवक सुरु आहे. तर धरणातून उजव्या कालव्यात 900 क्युसेक्स, डाव्या कालव्यात 400 क्युसेक्स आणि पैठण जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील विहिरींनाही मोठा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या  

नाथसागराची शंभरीकडे वाटचाल, कोरड्याठाक मराठवाड्यात उमेदीची ‘लाट’

स्पेशल रिपोर्ट : मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटला, ‘जायकवाडी’ 87 टक्के भरलं   

जायकवाडीमुळे 1972 ला पाण्याखाली गेलेल्या गावाचं 2019 ला दर्शन 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.