Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला जबर धक्का! सतेज पाटलांच्या पॅनेलची मुसंडी, तब्बल 15 जागांवर…
महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीत 5416 मतदारांपैकी तब्बल 5414 मतदारांनी मदतान केले होते. सध्या मतमोजणी केली जातेय.

Gokul Election : कोल्हापूरातील गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्ण ताकद लावली होती. काहीही झालं तरी गोकुळची सत्ता आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. याच मतमोजणीत आतापर्यंत सतेज पाटील यांच्या पॅनेलचे तब्बल 15 उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत विक्रमी 99.96 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खुद्द हसन मुश्रीफ यांचे पुत्रच मतमोजणीत पिछाडीवर आहेत.
कोण किती जागांवर आघाडीवर?
या निवडणुकीत महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीत 5416 मतदारांपैकी तब्बल 5414 मतदारांनी मदतान केले होते. सध्या मतमोजणी केली जातेय. पुढच्याच काही तासांत चित्र स्पष्ट होणार आहे. गोकुळ दूध संघावर कोणाची सत्ता हे स्पष्ट होणार आहे. परंतु आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. कारण या ठिकाणी एकूण 25 जागांपैकी 14 जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अन्य 11 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
नवा इतिहास घडणार?
विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ या मतमोजणीत पिछाडीवर आहेत. निकाल आपल्याच बाजूने यावा म्हणून महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना देवीच्या शपथा घालायला लवल्या होत्या, असे म्हटले जात आहे. परंतु सध्याच्या हाती आलेल्या कलानुसार मतदारांवर याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाहीये. हाच कल कायम राहिला तर मुश्रीफ यांच्या पुत्राचा पराभव होण्याची शक्यता आहे. तसेच सतेज पाटील यांच्या पॅनेलचाही विजय होऊ शकतो. दरम्यान असाच ट्रेंड कायम राहिला तर गोकुळच्या निवडणुकीत नवा इतिहास घण्याची शक्यता आहे. पुढच्याच काही तासात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.