गोकुळ निवडणुकीत सतेज पाटीलच बॉस! आता हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यातले भांडण…

गोकुळ निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होत आहे. यावेळी सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटीलच बॉस! आता हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यातले भांडण...
Gokul Election Result
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 11:12 PM

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवला. महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीतील शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणं आणि त्यानंतर झालेली युती मतदारांना आवडली नसावी, असं म्हटलं. त्याचवेळी नव्या संचालक मंडळाला सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

हसन मुश्रीफांनी नेमकं काय म्हटलंय?

​गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत. ​या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी. बाद झालेली मतेही लक्षणीय आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल अशा शुभेच्छा. सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू.

Loading...

फायनल निकाल

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने 13 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला, तर महायुतीच्या वाट्याला 12 जागा आल्या. रात्री 9 वाजून गेल्यानंतरही निकालाची अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम होती. पण आता निकाल फायनल झाला असून आता सतेज पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोहित पवारांनी दिलेला इशारा

दरम्यान, गोकुळचा निकाल फिरवण्यासाठी सूत्रे हलवली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल स्पष्ट असतानाही निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून निकाल बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते.

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीचा कौल स्पष्ट आहे. पण आता सत्तेचा दुरुपयोग सुरू झाल्याचे कळत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकालासाठी सूत्रे हलवली जात आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. तसेच निकाल चोरण्याचा प्रयत्न झाल्यास प्रामाणिक सभासदांशी गाठ असेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे गोकुळच्या निकालानंतर आता फेरमतमोजणीच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us