Gokul Election Result : निकाल लागत नाहीत तोच..आता गोकुळमध्ये फोडाफोडी का? अध्यक्ष निवडीत नवीन ट्विस्ट

कोल्हापूरच्या दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. या ट्विस्टमुळे सतेज पाटलांच्या पॅनेलचे टेन्शन वाढलं आहे.

Gokul Election Result : निकाल लागत नाहीत तोच..आता गोकुळमध्ये फोडाफोडी का? अध्यक्ष निवडीत नवीन ट्विस्ट
Gokul milk union
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 8:31 AM

कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या अतिटीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. या निवडणुकीत ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळाले. एका क्षणाला गेम पालटणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु एक जागा अधिक जिंकत सतेज पाटील यांच्या पॅनेलने बाजी मारली. आता गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीतही ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या ट्विस्टमुळे विजय रथ खेचून आणणाऱ्या सतेज पाटलांचं टेन्शन वाढलं आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.  अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे आहेत 13 संचालक आहेत. तर महायुतीकडे 12 संचालक आहेत. यामुळे अध्यक्ष निवडीत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता समविचारी आघाडी आणि महायुती समझोता करणार की एकमेकांचे संचालक फोडण्याचा प्रयत्न होणार याकडे लक्ष लागला आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी गोकुळची अध्यक्ष निवड होणार आहे.

Loading...

गोकुळ निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना फटका बसला. नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. काही जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती. दोनदा शौमिका महाडिक आणि तीन वेळा युवराज पाटील यांची फेरमतमोजणी झाली. या सर्व फेरमतमोजणीनंतर सतेज पाटील यांचं पॅनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनला सत्तेस्तापनेसाठी 13 जागांचं काठावरचं बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीनंतर सत्त्तास्थापनेचा तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

 

गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहा

(सर्वसाधारण गट)

अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

राहुल पांडुरंग पाटील (महायुती) ⁠

चेतन अरुण नरके (महायुती)

अजित शशिकांत नरके (महायुती)

किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

मदन बाबुराव देसाई (महायुती)

बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

अजित पांडुरंग पाटील (महायुती)

कर्णसिह गायकवाड (महायुती )

विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

अमर पाटील कोडोली (महायुती)

 

महिला राखीव गट

अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट

शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट

राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट

बयाजी शेळके (सतेज पाटील)

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us