Gondia | गोंदिया पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पकडली 2 लाख 11 हजारांची अवैध दारू, 4 जणांना केली अटक!

| Updated on: Jul 04, 2022 | 8:32 AM

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ब) (क) (ड), 68,81,83 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोंदिया जिल्हात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू भट्टीवर धाड टाकण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. यामुळे अवैध दारू भट्टी चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध दारू भट्टी चालकांनी धसका घेतल्याचे चित्र आहे.

Gondia | गोंदिया पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पकडली 2 लाख 11 हजारांची अवैध दारू, 4 जणांना केली अटक!
Image Credit source: tv9
Follow us on

गोंदिया : घरामागे सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर धाड टाकत तिरोडा पोलिसांनी (Police) चार आरोपींला अटक केली आहे. ही घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथील आहे. यावेळी 2 लाख 11 हजारांची अवैध दारू जप्त करण्यात आली असून संजय सोविंदा बरेकर (35) रा. रामाटोली सिल्ली, स्वप्निल हंसराज मेश्राम (23) रा. भिवापूर, अनमोल सुक्कल कडवे (35) रा. निलागोंदी, सत्यशील चिंधू बन्सोड (35) रा. ठाणेगाव यांना अटक (Arrested) करण्यात आली. मोहफुलापासून अवैध दारू गाळणाऱ्या आरोपींच्या विरोधात गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केलीयं.

घराच्या पाठीमागे अवैध दारुभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती

मोहफुलापासून अवैध दारू गाळणाऱ्या आरोपींच्या विरोधात गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलिसांनी कंबर कसली असून ही कारवाई करण्यात आली. वडेगाव पोलीस चौकी परिसरात रामाटोली सिल्ली येथील संजय बरेकर याच्या घराच्या पाठीमागे अवैध दारुभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिरोडा पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकत चौघांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

2 लाख 11 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

या आरोपींजवळून 3 लोखंडी ड्रममध्ये 60 किलो मोहफूल किंमत 4 हजार 800 रुपये, 7 प्लास्टिक कॅनमध्ये 70 लिटर मोहफुलाची दारू किंमत 7 हजार रुपये, एका प्लास्टिक ड्रममध्ये 50 लिटर मोहफुलाची दारू किंमत 5 हजार, मोहफूल ठेवलेली 152 पोती किंमत 1 लाख 82 हजार 400 रुपये 4 ड्रम किंमत 4 हजार, 3 मोठे पातेले व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिरोडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई