गडचिरोलीत मोठं ऑपरेशन! रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओडिशातून हुल्ला टीम कशासाठी आलीय? पाहा Video

| Updated on: Nov 16, 2022 | 2:16 PM

अनेक वर्षांपासून दिसेनासे झालेले हत्ती मागील वर्षी गडचिरोलीत दाखल तर झाले, मात्र गडचिरोली-गोंदियातील नागरिकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरतेय. हत्तींचा नेमका बंदोबस्त कसा करायचा, हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.

गडचिरोलीत मोठं ऑपरेशन! रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओडिशातून हुल्ला टीम कशासाठी आलीय? पाहा Video
Follow us on

मोहम्मद इरफानः गडचिरोलीत (Gadchiroli) काल रात्री एक मोठं ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशनसाठी (Operation) खास ओडिशातून (Odisha) टीम बोलावण्यात आली होती. पेटत्या मशाली, मोठ-मोठ्या टॉर्चच्या प्रकाशात येथील हत्तींना पळवून लावण्यात आलं. हे काम साधं सुधं नव्हतं. प्राण्यांमध्ये सर्वात बलवान समजल्या जाणाऱ्या हत्तींचा धुडगूस येथील नागरिकांच्या जीवावार उठलाय.

ओडिशा राज्यातूनच छत्तीसगड मार्गाने या हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. जवळपास वर्षभरापासून हे हत्ती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. अनेक वर्षानंतर गडचिरोलीचं वैभव असलेल्या गजराजांचा कळप महाराष्ट्रात परतल्यामुळे एकिकडे निसर्गप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे हत्तींचा बंदोबस्त कसा करायचा यावरून प्रशासनासमोर मोठं कोडं आहे.

रात्री-बेरात्री हत्तीचा कळप येऊन गावात घुसतो, लहान-लहान घरं उध्वस्त करतो. शेतीचं नुकसान तर वेगळंच. छत्तीसगड आ णि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची आणि कुरखेडा भागातल्या नागरिकांना तर जगणं मुश्कील झालं होतं.

येथील भातशेती आणि मकाशेतीचं मोठं नुकसान झालं. वेगवेगळ्या दोन हल्ल्यात एक महिला आणि एका पुरुषाचा बळी गेला. त्यामुळे या रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्याचं वनविभागानं ठरवलं.

 

हत्तींचा कळप एका ठिकाणी थांबत नसल्यामुळे ओडिशाच्या हुल्ला टीमला त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बोलावण्यात आलं. काल हुल्ला टीमने गडचिरोलीतील कोरची तालुक्यात मालेवाडा वनपरिक्षेत्रातून उपदली गावात हे ऑपरेशन केलं.

मोठ-मोठ्या मशाली लावून हत्तींना जंगलात पळवून लावण्यात आलं. आता या हत्तींनी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केलाय.

ओडिशातून आलेल्या हुल्ला टीममध्ये एकूण सात कर्मचारी आहेत. तर एक राऊंड ऑफिसर आहे. सध्या ही टीम गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली असून आता गोंदिया जिल्ह्यात ऑपरेशन होणार आहे.

हुल्ला टीमकडून हे हत्ती जंगलात पिटाळून लावण्यात येत आहेत. मात्र हत्तींचा नेहमीसाठी काय बंदोबस्त करायचा, असा प्रश्न राज्य सरकार आणि वनविभागासमोर आहे.