पुण्यात शनिवार वाड्याजवळचा दर्ग्याचा वाद पेटला, हिंदू महासभा आक्रमक, काय भूमिका?

मनसेच्या सभेत अजय शिंदे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यातील शनिवार वाड्याच्या दर्ग्याचा वाद आता पुन्हा उफाळून आलाय.

पुण्यात शनिवार वाड्याजवळचा दर्ग्याचा वाद पेटला, हिंदू महासभा आक्रमक, काय भूमिका?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:49 AM

अभिजित पोते, पुणेः पुण्यातील शनिवार वाडा (Shaniwarwada) परिसरातील दर्ग्याचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. येथील दर्गा (Durga) अनधिकृत असून तो गेल्या काही वर्षातच दिसायला लागलाय. त्यामुळे हा दर्गा आधी हटवून टाकण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) वतीने करण्यात आली आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी आज टीव्ही 9 शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. इंग्रजांनी जाताना हे थडगं इथे तयार केल्याचं काही इतिहासकार म्हणतायत, तर ते इथून काढून टाकावं, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

पुण्यातील शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाला उत्तर दरवाजा म्हटलं जातं. 1233 साली हा दर्गा बांधण्यात आला होता, असं म्हटलं जातं. पण येथील बॅनर्सनुसार हा 1244 साली बांधण्यात आल्याचं दिसून येतंय. पण हा दर्गा अनधिकृत आहे आणि तो पाडण्यात यावा, अशी मागणी हिंदु महासभेने पुरातत्व विभागाकडे केली आहे.

आनंद दवे म्हणाले, शनिवार वाड्याच्या प्रांगणात, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हे येतं. हे 20-25 वर्षांपूर्वीचं थडगं आहे. पांडुरंग बलकवडे हे याला 200 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगतायत. तो विषय वेगळा आहे. पण या दर्ग्याला धार्मिक स्थान नाही. त्यामुळे हे थडगं इथे का असलं पाहिजे, असा प्रश्न हिंदू महासभेने उपस्थित केलाय.

शनिवार वाड्याची जमीन अधिकृत करण्यापासून भूमीपूजन, खर्चानुसार प्रत्येक गोष्टीचा उल्लेख इतिहासात आहे. इथं कोणत्याही दर्ग्याचा उल्लेख नाही. पांडुरंगराव बलकवडे यांनीही असं सांगितलंय. इंग्रजांनी जाताना मुद्दाम इथं हे करून ठेवलंय. मग ते आपण का ठेवायचं? असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.

22 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या दर्ग्याचा विषय काढला होता. पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी आहेत. काशीतील ज्ञानवापी मंदिराप्रमाणेच पुण्यातही मंदिराच्या जागी मशिदी झाल्या पाहिजेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर शनिवार वाडा परिसरातील दर्गा हटवण्यात यावा, ही मागणी जोर धरू लागली. आता हिंदू महासभेच्या भूमिकेनंतर हा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

Non Stop LIVE Update
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.