Corona Vaccine Dry Run | जालन्यात कोरोना लसीकरणाची ड्राय रन सुरु, आरोग्यमंत्री टोपेंकडून संपूर्ण कार्यपद्धती समजून घ्या

| Updated on: Jan 02, 2021 | 10:18 AM

जालन्यासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरु झाले. Rajesh Tope Corona Vaccine Dry Run

Corona Vaccine Dry Run | जालन्यात कोरोना लसीकरणाची ड्राय रन सुरु, आरोग्यमंत्री टोपेंकडून संपूर्ण कार्यपद्धती समजून घ्या
Follow us on

जालना : जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन (Corona Vaccine Dry Run) सुरु झालं आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. लसीकरण केंद्र परिसरात आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावून सांगितली. प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासाचे निरीक्षण, चार सूचना अशा पद्धतीनेही मोहीम राबवली जाईल. (Health Minister Rajesh Tope explains Corona Vaccine Dry Run in Jalna)

ऑब्झर्व्हेशन रुममध्ये काय काय?

जालन्यासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरु झाले. यामध्ये कोणालाही लस दिली जात नाही. राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अर्धा तास त्यांना ऑब्झर्व्हेशन रुममध्ये ठेवण्यात येईल. या ठिकाणी टीव्ही, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीला टेन्शन येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

लसीकरण बूथवर कोणकोणते टप्पे?

निरीक्षण प्रक्रियेला अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन म्हटले जाते. अर्धा तास थांबल्यानंतर काही जणांना छोटा-मोठा परिणाम जाणवल्यास त्याचे निरीक्षण केले जाईल. इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन अशा तीन पायऱ्या आहेत. कोणाला चक्कर आली, तर त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रशिक्षित नर्स या ठिकाणी तैनात असतील. एका बूथवर शंभर जणांना लसीकरणाचे नियोजन केले जाईल. ओळखपत्र आणि कोरोना लस अॅपची पडताळी करणारे पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि मग वॅक्सिनेशन बूथ असे टप्पे पार करुन जावं लागेल. (Health Minister Rajesh Tope explains Corona Vaccine Dry Run in Jalna)

लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना

कोरोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना दिली जाईल. या काळात कसं वागावं, याच्या सूचना दिल्या जातील. लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशा आविर्भावात कोणी वागू नये. त्याचे परिणाम जाणवायला दोन चार महिने लागू शकतील. तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कला पर्याय नाही.

इमर्जन्सी म्हणून सीरमच्या लसीला मान्यता मिळाली आहे, परंतु अद्याप ड्रग कंट्रोलची मान्यता अप्राप्त आहे. ती लवकरच मिळेल अशी आशा आहे. जानेवारीत लसीकरण सुरु झाले तरी चार-सहा महिने लागतील. वर्षभरात पूर्णपणे टप्प्याटप्प्याने दोन डोसची लसीकरण मोहीम पूर्ण होईल, असंही टोपेंनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

COVID-19 vaccine: ड्राय रनमध्ये काय होणार; लोकांना लस दिली जाणार का?

(Health Minister Rajesh Tope explains Corona Vaccine Dry Run in Jalna)