AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

'कोव्हिशिल्ड' (covishield) या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली.

Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?
Serum Institute of India's vaccine candidate, Covishield approved for emergency use
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 01, 2021 | 5:57 PM
Share

मुंबई :’कोव्हिशिल्ड’ (covishield) या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. भारतातील ही पहिली लस ठरली आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका (Oxford AstraZeneca Coronavirus Vaccine) या कंपनीनं विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये (Serum Institute of India) उत्पादित होणारी ही ‘कोव्हिशिल्ड’ (covishield) लस आहे. यासाठी आधीपासूनच सरकारनं पावलं (Government Of India) उचलायला सुरुवात केली होती. मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या (Government of the United Kingdom) या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. (The Oxford Corona vaccine covishield is expected to be approved in India) अखेर आज या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.

काही अटी-शर्तींसह सीरमची कोरोना लस ‘कोविशिल्ड’चा वापर करण्याची शिफारस केली आहे. या अटी कोणत्या असणार, याचा निर्णय आता डीसीजीआय घेणार आहे. ऑक्सफोर्डमधील कोरोना प्रतिबंधित लस ‘कोविशिल्ड’च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची तयारी CDSCO तज्ज्ञ समितीने केली आहे. कोरोना लस ‘कोवाक्सिन’ च्या आपत्कालीन वापरास अनुमती देण्यासाठी आज बैठक झाली.

कोरोनावर 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ‘कोव्हिशिल्ड’!

‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.

‘कोव्हिशिल्ड’ ची किंमत काय असणार?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच ‘कोव्हिशिल्ड’चं उत्पादन करत आहे. सीरममध्ये ‘कोव्हिशिल्ड’चे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार,  ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींकडूनही ‘कोव्हिशिल्ड’ची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सीरमला भेट दिली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी लसीबद्दलची सगळी माहिती घेतली. किती प्रमाणात उत्पादन सुरु आहे? लस किती प्रभावी ठरु शकते? लस साठवण्यासाठी काय करावं लागेल? लसीकरण कार्यक्रम राबवताना सीरमची कशी मदत होईल? याबाबतची सगळी माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली. त्यानंतरच सीरमच्या लसीला सर्वात आधी मान्यता मिळेल ही शक्यता वर्तवली जात आहे.

कोट्यवधी डोस तयार करण्याची सीरमची क्षमता

‘कोविशिल्ड’ बाबत भारतासाठी चांगली गोष्ट ही की, या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. सीरम इन्स्टिट्युट ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची लस निर्मिती क्षमता अफाट आहे. आतापर्यंत सीरममध्ये तब्बल 5 कोटी कोविशिल्ड तयार झाल्याची माहिती आहे. तर जुलै 2021 पर्यंत सीरमनं तब्बल 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विकसनशील देशांना लस पुरवण्यासाठी सीरमनं ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीबरोबर करार केला आहे.

ऑक्सफर्डच्याच कोविशिल्डची निवड का?

जगभरात एवढ्या लसी तयार झाल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेक लसी तिसऱ्या टप्प्यातही यशस्वी ठरल्या आहे, मग कोविशिल्डला मान्यता देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कोविशिल्ड या लसीचं उत्पादन पुण्यात होत आहे, त्यामुळं भारतात तिची वाहतूक सहज शक्य आहे, त्यामुळं वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. शिवाय कोविशिल्डला अतिथंड तापमानाची गरज लागत नाही. इतर लसींची उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवण करावी लागते, आपल्याकडे प्रत्येक भागात ही क्षमता अजूनतरी नाही. मात्र, त्याचवेळी कोविशिल्ड ही लस सहज साठवता येऊ शकते. आणि कोविशिल्ड ही लस निवडण्याचं तिसरं कारण आहे किंमत, या लसीची किंमत अतिशय कमी आहे. अवघ्या 500 ते 600 रुपयांना ही लस मिळणार आहे. जगातील इतर लसींशी तुलना केली तर ही किंमत नाममात्र आहे. त्यामुळंच कोविशिल्डला सरकार प्राधान्य देण्याच्या विचारात आहे.

लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवला जाणार?

कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे महालसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकींग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण बूथवर लसीकरण कसं होणार?

लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला ऑब्जरवेशन रुममध्ये पाठवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

51 लाख लोकांना लस, 48 सरकारी, 100 खासगी रुग्णालयं सज्ज, केजरीवालांचा लसीकरणाचा मेगाप्लॅन

(The Oxford Corona vaccine covishield is expected to be approved in India)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…