कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांना दिलासा; शेतीवर होणार परिणाम

| Updated on: Apr 05, 2022 | 7:20 PM

अचानक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या या दिवसात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून पासून काही वेळेसाठी दिलासा मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांना दिलासा; शेतीवर होणार परिणाम
इचलकरंजीसह सांगली शहर परिसरात पावसाची हजेरी
Image Credit source: TV9
Follow us on

इचलकरंजीः इचलकरंजी शहरासह (Ichalkarnji) ग्रामीण भागामध्ये वादळी पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने (Rain) अचानकर हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारापेठेत पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे हाल झाले.

अचानक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या या दिवसात पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून पासून काही वेळेसाठी दिलासा मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात कडक उन्हामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

काजू उत्पादनावर परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यात सध्या काजूचा हंगाम आहे. सध्या दाट धुकं पडल्यामुळे काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काजूही जास्त लागली नसल्याने या पावसाचा काजूवर काही परिणाम होतो का याच्या प्रतिक्षेत काजू उत्पादक आहे.

सांगली शहर व परिसरात पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत

सांगली शहर व परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज सकाळपासूनच सांगली शहरासह ग्रामीण परिसरात उष्णता जाणवत होती. त्यानंतर दुपार ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारच्या सुमारास वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या संगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

सध्या सांगली जिल्ह्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागातही उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. उष्णतेमुळे कंटाळलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या द्राक्ष बागेतील कामंही आटपत आली असून ऊस तोडही संपत आली आहे. त्यामुळे या पावसाचा शेतीवर गंभीर परिणाम होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित

“सीसीआय”च्या रडारवर Zomato-Swiggy, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

Amravati Murder : गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं