AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित

स्पर्धा आयोगानं स्विगी आणि झोमॅटो (Swiggy and Zomato) दोन्ही कंपन्यांचे व्यवसाय प्रारुप आणि कार्यपद्धती तपासणीचे आदेश जारी केले आहेत. भारतीय स्पर्धा कायदा कलम 3(1)आणि 3(4) अन्वये स्पर्धा आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 7:02 PM
Share

नवी दिल्ली : आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्या स्विगी आणि झोमॅटो (Swiggy and Zomato) चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. केंद्रीय स्पर्धा आयोगाला (Competition Commission of India) प्राथमिक पाहणीत व्यवहारांत अनियमितता आणि तक्रारीत तथ्य जाणवल्याने दोन्ही कंपन्यांविरोधात चौकशीचा बडगा उगारला आहे. स्पर्धा आयोगानं दोन्ही कंपन्यांचे व्यवसाय प्रारुप आणि कार्यपद्धती तपासणीचे आदेश जारी केले आहेत. भारतीय स्पर्धा कायदा कलम 3(1)आणि 3(4) अन्वये स्पर्धा आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 60 दिवसांत सर्व तपशीलवार अहवाल सादर करण्याचे बंधन चौकशी अधिकाऱ्यांवर असणार आहे. फूड डिलिव्हरी (Food Delivery) कंपन्यांच्या चौकशीच्या बातम्यानंतर शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 82.15 वर पोहोचला.

तक्रारींचा पाढा

झोमॅटो आणि स्विगी विरोधात नॅशनल रेस्टॉरेंट असोसिएशन ऑफ इंडियाने तक्रारीचा पाढा लावला होता. दोन्ही फूड डिलिव्हरी कंपन्यानी देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरेंटमध्ये व्यवहारात अनुचित प्रकार केल्याचा दावा रेस्टॉरेंट संघटनेने केला होता. आकर्षक सूट, करारबद्धता आणि विशिष्ट रेस्टॉरंटला सवलत बहाल करण्याद्वारे भारतीय स्पर्धा कायदाचे उल्लंघन केले जात असल्याचा ठपका तक्रारीत ठेवला आहे. यासोबत देयक देण्यास होणारा विलंब, एकतर्फी नियम, नियमांपेक्षा अधिक कमिशनची आकारण आदी आरोप करण्यात आले आहे.

तक्रारींचा पाढा ‘पॉईंट टू पॉईंट’

• आकर्षक सूटीचे नियमबाह्य प्रस्ताव • स्पर्धा कायद्याचं उल्लंघन करीत करारबद्धतेचा भंग • विशिष्ट रेस्टॉरंटला नियमबाह्य सवलत • रेस्टॉरंटच्या देयकास मोठ्या प्रमाणात विलंब • एकतर्फी नियमांची निर्मिती • नियमांपेक्षा अधिक कमिशनची आकारणी

शेअर मार्केट डाउन

केंद्रीय स्पर्धा आयोगाच्या चौकशी आदेशानंतर आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्या स्विगी आणि झोमॅटोचे शेअर्स गडगडले आहेत. आजच्या शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 82.15 वर पोहोचला. फूड डिलिव्हरी कंपनीचा स्टॉक गेल्या महिन्यांत 75.55 रुपयांच्या नीच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 169.10 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. झोमॅटोने आयपीओच्या माध्यमातून 9,375 कोटी रुपये उभारले होते.

संबंधित बातम्या

सर्व जगातच इंधनाचे दर वाढले, अमेरिकेत पेट्रोलच्या भावात 55 टक्क्यांची वाढ; इंधन दरवाढीवर सरकारचे स्पष्टीकरण

SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण

Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.