AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Murder : गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं

पत्नीनं गळा आवळून आपल्याच पतीचा जीव घेतला (Amravati Crime) आहे. अमरावती जिल्हा या हत्येच्या घटनेनं हादरुन गेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरी गावात ही घटना घडली आहे.

Amravati Murder : गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं
पत्नीनं केली पतीची हत्याImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 6:44 PM
Share

अमरावती : दारु पिऊन त्रास देतो म्हणून पतीची हत्या (Husband Murder) करण्यात आली आहे. पत्नीनं गळा आवळून आपल्याच पतीचा जीव घेतला (Amravati Crime) आहे. अमरावती जिल्हा या हत्येच्या घटनेनं हादरुन गेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरी गावात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दारु पिऊन (Alcohol) पती माहेरी येऊन सतत महिलेला त्रास देत होता, असा आरोप करण्यात आला आहे. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं पतीला इलेक्ट्रीक खांबाला बांधलं. त्यानंतर पतीची गळा आवळून हत्या केली आहे. या हत्येनं मोझरी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर परिसरातही भितीचे वातावरण पसरलं आहे. तर आता या दाम्पत्यांच्या मुलांचं काय होणाार? असाही सवाल आहे.

हत्येआधी काय घडलं?

पत्नी आपल्या माहेरी राहत होती. माहेरी राहून ही महिला एका कंपनीच काम करत होती. कंपनीतून मिळणाऱ्या पगारावर ही महिला आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत होती. दरम्यान, सतत माहेरी येऊन या महिलेचा पती तिला त्रास देत होता. या पतीनं दारु पिऊन पत्नीला त्रास दिल्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललं. हत्येआधी या महिलेनं आपल्या पतीचं शरीर एका खांबाला दोरखंडानं बांधून ठेवलं होतं. हत्येआधी तिचा पती दारु पिऊन आला असावा, अशीही शंका घेतली जातेय.

आरोपी महिलेचं नाव माधुरी सुनील वंजारी असं आहे. तिनं आपल्या पतीची गळा दाबून हत्या केली. हत्येआधी या महिलेनं आपल्या पतीला इलेक्ट्रीक खांबाला बांधलं होतं. त्यानंतर गळा आवळून माधुरी यांनी पती सुनील वंजारीचा जीव घेतला.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ज्याची हत्या करण्यात आली तो सुनील वंजारी हा इसम पांढरी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे. 14 वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आईनंच वडिलांचा जीव घेतल्यामुळे आत दोन मुलांचं काय होणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक झालेल्या दोन मुलांवरचं छत्र हरपलंय.

संजय बियाणी हत्येच्या तपासासाठी विशेष पथक; नांदेडमध्ये काही काळ तणाव, तपासाचे मोठे आव्हान

Koregaon Bhima : फसवणूकप्रकरणी सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Bhandara : मावशीने दिले गुंगीचे औषध, बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ, घडला हा विपरीत प्रकार

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.