AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय बियाणी हत्येच्या तपासासाठी विशेष पथक; नांदेडमध्ये काही काळ तणाव, तपासाचे मोठे आव्हान

अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात बियाणी यांचा चालक जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली

संजय बियाणी हत्येच्या तपासासाठी विशेष पथक; नांदेडमध्ये काही काळ तणाव, तपासाचे मोठे आव्हान
संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्काImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 6:31 PM
Share

नांदेड: बिल्डर संजय बियाणी  (Sanjay Biyani) यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक नेमले गेले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (District Superintendent of Police) दिली आहे. बियाणी यांच्या मृत्यूनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावणर पसरले होते. शहरात तणावग्रस्त वातावरण असल्याने नांदेडमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. त्यानंतर पोलिसांनी (Nanded Police) शहरात बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला होता.

अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात बियाणी यांचा चालक जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ शोध लावण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळ यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितले की, बियाणी यांच्यावर हल्लेखोरांनी एकूण बारा गोळ्या झाडल्या आहेत. त्यापैकी त्यांना चार गोळ्या लागल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. सध्या तपास सुरु असून या हत्येमागचे कारण आणि आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी वाढली

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरातील गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. भरदिवसा संजय बियाणी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने नांदेडमध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

संजय बियाणी यांच्यावर घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांची प्राणज्योत मालवली आहे तर त्यांचा चालकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

Koregaon Bhima : फसवणूकप्रकरणी सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Bhandara : मावशीने दिले गुंगीचे औषध, बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ, घडला हा विपरीत प्रकार

इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्यातील आरोपींना पाच तासात गजाआड; दोघांना ताब्यात

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.