AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर

नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते.

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर
संजय बियाणी हत्या प्रकरणातील दुचाकीच्या मालकाला अटकImage Credit source: टीव्ही9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 05, 2022 | 2:41 PM
Share

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं दिसत आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा रुग्णालायत उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. नांदेड शहरात भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्यावर कोणी हल्ला केला, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संजय बियाणींच्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांची प्राणज्योत मालवली.

संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणाव निर्माण झाला आहे

कुख्यात गुंडाची खंडणीसाठी धमकी

संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती, त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.

नांदेडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं गेल्या काही काळात पाहायला मिळत आहे. गोळीबाराच्या घटना वरचे वर घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात भीती व्यक्त केली जात आहे.

पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani | नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डरवर गोळीबार, संजय बियाणी गंभीर जखमी

बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक

विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये Gang War, गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...