Sanjay Biyani | नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डरवर गोळीबार, संजय बियाणी गंभीर जखमी

प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. बियाणी घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Sanjay Biyani | नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डरवर गोळीबार, संजय बियाणी गंभीर जखमी
संजय बियाणींच्या आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:19 PM

नांदेड : गोळीबाराच्या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध बिल्डरवर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. संजय बियाणी (Sanjay Biyani) असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. बियाणी घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही गोळीबाराची (Firing) घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले आहेत. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र भरदिवसा रस्त्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नांदेड हादरले आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्याच घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झालाय. या दोन्ही जखमींवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेत आहेत. यातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे. संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोळीबारात बियाणी गंभीर जखमी

दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालीय का याचा शोध घेणे सुरू आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरलीय.

संबंधित बातम्या :

बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक

विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये Gang War, गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणाऱ्यांना बेड्या, नांदेड गोळीबार प्रकरणी चौघांना अटक

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.