AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणाऱ्यांना बेड्या, नांदेड गोळीबार प्रकरणी चौघांना अटक

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी सर्वजण उत्साहात होते. एकमेकांना रंग लावण्यात अनेक नागरिक दंग होते. याच वेळी माळटेकडी उड्डाणपुलावर ही घटना घडली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी तोंडाला रंग लावून आले होते तसेच तोंडाला रुमालही बांधला होता.

Nanded |  धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणाऱ्यांना बेड्या, नांदेड गोळीबार प्रकरणी चौघांना अटक
गोळीबारप्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 11:46 AM
Share

नांदेडः धुळवडीच्या दिवशी (Nanded Dhulwad) नांदेडमधील माळटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून पाठलाग करून या आरोपींना पकडले. हे सराईत गुन्हेदार असून पोलिसांनी आरोपींना विमानतळ पोलिसांच्या (police) ताब्यात दिले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी शहरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र तोंडावर रंग लावून आणि रुमालाने तोंड झाकून आलेल्या दोघांनी दीपक बिगानिया या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत बिगानिया जखमी झाला होता. त्यावेळी घटनास्थळ पोलील उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

धुलिवंदनाच्या दिवळी झाला होता गोळीबार

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी सर्वजण उत्साहात होते. एकमेकांना रंग लावण्यात अनेक नागरिक दंग होते. याच वेळी माळटेकडी उड्डाणपुलावर ही घटना घडली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी तोंडाला रंग लावून आले होते तसेच तोंडाला रुमालही बांधला होता. त्यांनी काही काळ दीपक बिगानिया या तरुणाचा पाठलाग केला. पूर्ववैमनस्यातून त्यांनी बिगानिया याच्यावर गोळीबार केला होता. यात बिगानिया जखमी झाला होता. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पथके नियुक्त केली होती.

पाठलाग करून पकडले

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. बोंढार बायपासवर गाडेगाव येथे हे आरोपी फरित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथख त्या ठिकाणी पोहोचताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी पाठलाग करून ईश्वरसिंग गाडीवाले, राधेश्याम अंकुशराव कुंडगीर, कुलविंदरसिंग महाजन आणि गणपतसिंग मठवाले या चार जणांना अटक केली.

इतर बातम्या-

Mithi River : मिठी नदीचा पूर टाळण्यासाठी पालिकेची नवी आयडिया, फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय

Pune crime : अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्या बिल्डर अन् वकिलांना बेड्या

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.