Monsoon Update : भंडारा जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

| Updated on: Aug 15, 2022 | 7:27 AM

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आधीच 5 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले ओसांडून वाहत होते. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Monsoon Update : भंडारा जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा
Image Credit source: tv9
Follow us on

भंडारा : राज्याच्या जवळपास सर्वच भागात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सकंट ओढावलं तर काही जणांवर स्थलांतरणाची वेळ आली. दरम्यान एक ऑगस्टपासून पावसाने काही दिवस विश्रांती दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. शेतीच्या कामांना वेग आला होता, मात्र पुन्हा एकदा सहा ऑगस्टपासून राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस (Rain) सुरू असल्याने या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.  आधीच 5 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले ओसांडून वाहत होते. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्याच्या काही भागांत पुराचा धोका निर्माण झाला आहे.

जोरदार पाऊस

भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेली होती. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरले. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने पुराचा धोका वाढला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्ह्याला यलो अलर्ट

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.  मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वैनगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे. तसेच गोसिखुर्द धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस सुरू असून, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे पहायला मिळत आहे.