Video | हिजाबप्रकरणी सीतेचे उदाहरण आमदारांच्या अंगलट, गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय केले वक्तव्य?

| Updated on: Feb 16, 2022 | 9:46 AM

मालेगावचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी 'हिजाब डे' पाळला. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Video | हिजाबप्रकरणी सीतेचे उदाहरण आमदारांच्या अंगलट, गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय केले वक्तव्य?
मौलाना मुफ्ती इस्माईल, आमदार, एमआयएम
Follow us on

मालेगावः हिजाब (Hijab) प्रकरणावरून कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यात उठलेली आरोप-प्रत्यारोपांची राळ, आंदोलनांनी आता वेगळेच वळण घेतलेय. याप्रकरणी मालेगावमध्यचे (Malegaon) एमआयएम (MIM) आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हिजाबचे समर्थन केले. त्यावेळी त्यांनी रामायणातील माता सीतेबद्दल एक उदाहरण दिले. त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी अॅड. मंजूषा कजवडकर यांनी मालेगावच्या पोलीस अधीक्षकांकडे एक लेखी फिर्याद दिली आहे. त्यात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. येणाऱ्या काळात मालेगावसह राज्यात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका होतायत. त्यापूर्वीच हिजाबप्रकरणावरून वादग्रस्त वक्तव्य करण्याची शर्यत लागलेली दिसतेय.

नेमके प्रकरण काय?

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला. त्यानंतर राज्यातील एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही प्रभावित शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा सल्ला दिला. याप्रकरणाचे मालेगावमध्येही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केले. मालेगावचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी ‘हिजाब डे’ पाळला. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.

काय म्हणाले आमदार?

टीव्ही 9 मराठीशी बोलताना एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद म्हणाले की, रामांची पत्नी सीता. त्या काळात त्यांना पळवून नेण्यात आलं होतं. कित्येक वर्ष त्यांनी दुसऱ्याच्या कैदेत घालवली. मात्र, त्यांनी आपली आपली इज्जत, चारित्र्याचे ज्या पद्धतीनं रक्षण केलं, त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हिजाब आणि पडदा होतं. त्याचं उदाहरण हे आहे की, त्यांचा दीर लक्ष्मणाला उभ्या राहिलेल्या स्त्रियांमध्ये सीता कोण हे ओळखायला सांगितलं. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं होतं की, मी आजपर्यंत माझ्या वहिणींचा चेहरा पाहिला नाहीय. कधीही नजर उठवून त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं नाही. मी माझ्या वहिणीला पायावरून ओळखू शकतो. त्यांनी तिथं उभ्या असलेल्या स्त्रियांचे पाय पाहिले. त्यावरून आपल्या वहिणीला ओळखलं होतं. आमचा हा दावा आहे की, रामायण आणि हिंदू धर्मातही स्त्रियांना पडदा घालण्याचा आदेश आहे. आजही अनेक हिंदू घरांमध्ये महिला पदर डोक्यावर घेतल्याशिवाय दीर किंवा इतरांच्या समोर येत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेलीय.

आमचा हा दावा आहे की, रामायण आणि हिंदू धर्मातही स्त्रियांना पडदा घालण्याचा आदेश आहे. आजही अनेक हिंदू घरांमध्ये महिला पदर डोक्यावर घेतल्याशिवाय दीर किंवा इतरांच्या समोर येत नाहीत.
– मौलाना मुफ्ती मोहम्मद, आमदार, एमआयएम

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!