कर्नाटकातील ‘हिजाब वादा’चे पडसाद आता मुंबईत! मुंब्रा आणि मदनपुरा भागात मुस्लिम महिलांकडून निदर्शनं आणि सह्यांची मोहीम

मुंब्रा येथे मुस्लिम महिलांनी विरोध दर्शवला. मुंब्रा येथे मुस्लिम तरुणी एकत्र आल्या आणि त्यांनी इंडियन मुस्लिम यूनियनच्या बॅनरखाली कर्नाटकातील घटनेचा निषेध व्यक्त केला. तसंच मुंबईतील मदनपुरा भागात हिजाबच्या समर्थनात मुस्लिम महिला आणि तरुणींनी सह्यांची मोहीम राबवली. मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुणी आणि महिला या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

कर्नाटकातील 'हिजाब वादा'चे पडसाद आता मुंबईत! मुंब्रा आणि मदनपुरा भागात मुस्लिम महिलांकडून निदर्शनं आणि सह्यांची मोहीम
कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद मुंबईत
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 10:49 PM

मुंबई : कर्नाटकमध्ये हिजाब (Karnatak Hijab) घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याच्या घटनेमुळे उफाळून आलेला वाद चांगलाच चिघळला आहे. कर्नाटकमधील उडपी (Udipi) येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हा प्रकार घडला. मात्र याचे पडसाद आता महाराष्ट्र आणि मुंबईत पाहायला मिळत आहे. कर्नाटकात हिजाबला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मुंब्रा येथे मुस्लिम महिलांनी (Muslim Women) विरोध दर्शवला. मुंब्रा येथे मुस्लिम तरुणी एकत्र आल्या आणि त्यांनी इंडियन मुस्लिम यूनियनच्या बॅनरखाली कर्नाटकातील घटनेचा निषेध व्यक्त केला. तसंच मुंबईतील मदनपुरा भागात हिजाबच्या समर्थनात मुस्लिम महिला आणि तरुणींनी सह्यांची मोहीम राबवली. मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुणी आणि महिला या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय?

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला. आता त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राज्यातील एका शैक्षणिक संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्यात आला आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काही प्रभावित शैक्षणिक संस्था एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, सदर व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिमोगा येथील असल्याचा दावा केला जात आहे. याच ठिकाणी आज सकाळी मोठी दगडफेक झाली होती. त्यानंतर तेथे 144 कलम लागू करण्यात आले आहे.

हिजाबचा वाद काय आहे?

साधारण 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येमाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे.

कर्नाटकातील शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद

हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुढील तीन दिवस राज्यातील सर्वा शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतत ठेवावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.